विजय माल्ल्याला दणका: प्रत्यर्पणाच्या निकालाविरुद्ध लंडन हायकोर्टात दाखल केलेली याचिका फेटाळली

लंडन - हजारो कोटींचे कर्ज बुडवून फरार असलेल्या विजय माल्ल्याची याचिका येथील हायकोर्टाने मंगळवारी फेटाळून लावली आहे. वेस्टमिंस्टर कोर्टाने 62 वर्षीय मद्य व्यापारी विजय माल्ल्याचे प्रत्यर्पण करण्याचा निकाल डिसेंबरमध्येच दिला होता. त्यानंतर याचवर्षी फेब्रुवारी महिन्यात ब्रिटनच्या गृहमंत्रालयाने माल्ल्याच्या प्रत्यर्पणाला मंजुरी दिली होती. परंतु, माल्ल्याने आपल्या प्रत्यर्पणाच्या विरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली. तीच याचिका आता फेटाळून लावण्यात आली आहे.विजय माल्ल्याने भारतीय बँकेकडून 9 हजार कोटी रुपयांचे कर्ज घेऊन बुडवले आहे. मार्च 2016 मध्ये तो भारत सोडून पसार झाला. तेव्हापासूनच तो ब्रिटनमध्ये राहत आहे. मुंबईच्या विशेष न्यायालयाने माल्ल्याला आर्थिक गुन्हेगारी प्रकरणी फरार घोषित केले. गेल्या वर्षी वेस्टमिंस्टर कोर्टाने त्याचे भारतात प्रत्यर्पण करण्याचा निकाल दिला होता. अंमलबजावणी संचलनालयाने माल्ल्याची देश-विदेशातील संपत्ती सील करण्यात आली. Download Dainik Bhaskar App to read Latest Hindi News Today vijay mallya extradition uk court rejects mallayas plea against extradition order


 विजय माल्ल्याला दणका: प्रत्यर्पणाच्या निकालाविरुद्ध लंडन हायकोर्टात दाखल केलेली याचिका फेटाळली

लंडन - हजारो कोटींचे कर्ज बुडवून फरार असलेल्या विजय माल्ल्याची याचिका येथील हायकोर्टाने मंगळवारी फेटाळून लावली आहे. वेस्टमिंस्टर कोर्टाने 62 वर्षीय मद्य व्यापारी विजय माल्ल्याचे प्रत्यर्पण करण्याचा निकाल डिसेंबरमध्येच दिला होता. त्यानंतर याचवर्षी फेब्रुवारी महिन्यात ब्रिटनच्या गृहमंत्रालयाने माल्ल्याच्या प्रत्यर्पणाला मंजुरी दिली होती. परंतु, माल्ल्याने आपल्या प्रत्यर्पणाच्या विरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली. तीच याचिका आता फेटाळून लावण्यात आली आहे.


विजय माल्ल्याने भारतीय बँकेकडून 9 हजार कोटी रुपयांचे कर्ज घेऊन बुडवले आहे. मार्च 2016 मध्ये तो भारत सोडून पसार झाला. तेव्हापासूनच तो ब्रिटनमध्ये राहत आहे. मुंबईच्या विशेष न्यायालयाने माल्ल्याला आर्थिक गुन्हेगारी प्रकरणी फरार घोषित केले. गेल्या वर्षी वेस्टमिंस्टर कोर्टाने त्याचे भारतात प्रत्यर्पण करण्याचा निकाल दिला होता. अंमलबजावणी संचलनालयाने माल्ल्याची देश-विदेशातील संपत्ती सील करण्यात आली.



Download Dainik Bhaskar App to read Latest Hindi News Today
vijay mallya extradition uk court rejects mallayas plea against extradition order