'वेळ पाहून' घड्याळ ठेवणार बाजूला - आमदार वैभव पिचड

अकोले - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुंबई प्रदेशाध्यक्ष सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशापाठोपाठ "राष्ट्रवादी'चे आमदार वैभव पिचड यांनीही "राष्ट्रवादी'ला रामराम ठोकण्याचा आणि घड्याळ काढून ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी काल (गुरुवारी) मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने ते भारतीय जनता पक्षात जाणार असल्याचे जवळपास निश्‍चित आहे; मात्र याबाबतची अधिकृत घोषणा उद्या (शनिवारी) तालुक्‍यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात करणार असल्याचे पिचड यांनी आज येथे स्पष्ट केले. वैभव यांचे वडील मधुकर पिचड यांच्या रूपाने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासह आघाडी सरकारमध्ये अनेक वर्षे मंत्रिपद उपभोगल्यानंतर पक्षाला रामराम ठोकण्याचा त्यांचा निर्णय "राष्ट्रवादी'ला मोठा धक्का मानला जात आहे. पिचड यांनीच प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत आज याबाबत माहिती दिली. पिचड म्हणाले, 'चांगले काम करताना आपल्या पुढच्या पिढीनेही चांगले काम करावे ही प्रत्येकाची अपेक्षा असते. माजी मंत्री मधुकर पिचड यांनी 40 वर्षे तालुक्‍यातील रस्त्यांची, धरणांची आणि एकूणच विकासाची कामे करत तालुक्‍याची बांधणी केली. मात्र या पाच वर्षांत कोल्हार-घोटी राज्यमार्गासह सर्व रस्त्यांची दुरवस्था झाली. विरोधी आमदार असल्याने विकासकामांना निधी मिळत नाही. त्यामुळे हा पाच वर्षांचा अनुभव पाहता सर्वसामान्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी पुढच्या काळात आपल्याला काही तरी निर्णय घेणे गरजेचे आहे, अशी सर्वसामान्य कार्यकर्त्यांचीही मागणी होती.'' आपण गेली पाच वर्षे सत्तेत नसल्याने तालुक्‍यातील पाणी पळवून नेले. निसर्गनिर्मित नाही, तर मानवनिर्मित दुष्काळाला सामोरे जावे लागले. "पिंपळगाव खांड'चेही पाणी पारनेरला नेण्याचा प्रयत्न आहे. जिल्ह्यात इतर तालुक्‍यांत कोट्यवधी रुपयांचा निधी, तर आपल्या तालुक्‍याला लाखात निधी मिळाला. त्यामुळे भविष्यात तालुका विकासापासून दूर राहून उद्‌ध्वस्त होऊ नये, म्हणून तत्त्व बाजूला ठेवून, हृदयावर दगड ठेवून हा निर्णय घेत आहे. - आमदार वैभव पिचड News Item ID: 599-news_story-1564164859Mobile Device Headline: 'वेळ पाहून' घड्याळ ठेवणार बाजूला - आमदार वैभव पिचडAppearance Status Tags: Section NewsSite Section Tags: Paschim Maharashtra Mobile Body:  अकोले - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुंबई प्रदेशाध्यक्ष सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशापाठोपाठ "राष्ट्रवादी'चे आमदार वैभव पिचड यांनीही "राष्ट्रवादी'ला रामराम ठोकण्याचा आणि घड्याळ काढून ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी काल (गुरुवारी) मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने ते भारतीय जनता पक्षात जाणार असल्याचे जवळपास निश्‍चित आहे; मात्र याबाबतची अधिकृत घोषणा उद्या (शनिवारी) तालुक्‍यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात करणार असल्याचे पिचड यांनी आज येथे स्पष्ट केले. वैभव यांचे वडील मधुकर पिचड यांच्या रूपाने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासह आघाडी सरकारमध्ये अनेक वर्षे मंत्रिपद उपभोगल्यानंतर पक्षाला रामराम ठोकण्याचा त्यांचा निर्णय "राष्ट्रवादी'ला मोठा धक्का मानला जात आहे. पिचड यांनीच प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत आज याबाबत माहिती दिली. पिचड म्हणाले, 'चांगले काम करताना आपल्या पुढच्या पिढीनेही चांगले काम करावे ही प्रत्येकाची अपेक्षा असते. माजी मंत्री मधुकर पिचड यांनी 40 वर्षे तालुक्‍यातील रस्त्यांची, धरणांची आणि एकूणच विकासाची कामे करत तालुक्‍याची बांधणी केली. मात्र या पाच वर्षांत कोल्हार-घोटी राज्यमार्गासह सर्व रस्त्यांची दुरवस्था झाली. विरोधी आमदार असल्याने विकासकामांना निधी मिळत नाही. त्यामुळे हा पाच वर्षांचा अनुभव पाहता सर्वसामान्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी पुढच्या काळात आपल्याला काही तरी निर्णय घेणे गरजेचे आहे, अशी सर्वसामान्य कार्यकर्त्यांचीही मागणी होती.'' आपण गेली पाच वर्षे सत्तेत नसल्याने तालुक्‍यातील पाणी पळवून नेले. निसर्गनिर्मित नाही, तर मानवनिर्मित दुष्काळाला सामोरे जावे लागले. "पिंपळगाव खांड'चेही पाणी पारनेरला नेण्याचा प्रयत्न आहे. जिल्ह्यात इतर तालुक्‍यांत कोट्यवधी रुपयांचा निधी, तर आपल्या तालुक्‍याला लाखात निधी मिळाला. त्यामुळे भविष्यात तालुका विकासापासून दूर राहून उद्‌ध्वस्त होऊ नये, म्हणून तत्त्व बाजूला ठेवून, हृदयावर दगड ठेवून हा निर्णय घेत आहे. - आमदार वैभव पिचड Vertical Image: English Headline: MLA Vaibhav Pichad NCP Shivsena PoliticsAuthor Type: External Authorसकाळ वृत्तसेवाआमदारराष्ट्रवादwomenसकाळmumbaisachin ahirभारतधरणविकासहृदयSearch Functional Tags: आमदार, राष्ट्रवाद, women, सकाळ, Mumbai, Sachin Ahir, भारत, धरण, विकास, हृदयTwitter Publish: Meta Keyword: MLA Vaibhav Pichad, NCP, Shivsena, PoliticsMeta Description: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुंबई प्रदेशाध्यक्ष सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशापाठोपाठ "राष्ट्रवादी'चे आमदार वैभव पिचड यांनीही "राष्ट्रवादी'ला रामराम ठोकण्याचा आणि घड्याळ काढून ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.Send as Notification: 

'वेळ पाहून' घड्याळ ठेवणार बाजूला - आमदार वैभव पिचड

अकोले - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुंबई प्रदेशाध्यक्ष सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशापाठोपाठ "राष्ट्रवादी'चे आमदार वैभव पिचड यांनीही "राष्ट्रवादी'ला रामराम ठोकण्याचा आणि घड्याळ काढून ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी काल (गुरुवारी) मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने ते भारतीय जनता पक्षात जाणार असल्याचे जवळपास निश्‍चित आहे; मात्र याबाबतची अधिकृत घोषणा उद्या (शनिवारी) तालुक्‍यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात करणार असल्याचे पिचड यांनी आज येथे स्पष्ट केले. वैभव यांचे वडील मधुकर पिचड यांच्या रूपाने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासह आघाडी सरकारमध्ये अनेक वर्षे मंत्रिपद उपभोगल्यानंतर पक्षाला रामराम ठोकण्याचा त्यांचा निर्णय "राष्ट्रवादी'ला मोठा धक्का मानला जात आहे. पिचड यांनीच प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत आज याबाबत माहिती दिली.

पिचड म्हणाले, 'चांगले काम करताना आपल्या पुढच्या पिढीनेही चांगले काम करावे ही प्रत्येकाची अपेक्षा असते. माजी मंत्री मधुकर पिचड यांनी 40 वर्षे तालुक्‍यातील रस्त्यांची, धरणांची आणि एकूणच विकासाची कामे करत तालुक्‍याची बांधणी केली. मात्र या पाच वर्षांत कोल्हार-घोटी राज्यमार्गासह सर्व रस्त्यांची दुरवस्था झाली. विरोधी आमदार असल्याने विकासकामांना निधी मिळत नाही. त्यामुळे हा पाच वर्षांचा अनुभव पाहता सर्वसामान्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी पुढच्या काळात आपल्याला काही तरी निर्णय घेणे गरजेचे आहे, अशी सर्वसामान्य कार्यकर्त्यांचीही मागणी होती.''

आपण गेली पाच वर्षे सत्तेत नसल्याने तालुक्‍यातील पाणी पळवून नेले. निसर्गनिर्मित नाही, तर मानवनिर्मित दुष्काळाला सामोरे जावे लागले. "पिंपळगाव खांड'चेही पाणी पारनेरला नेण्याचा प्रयत्न आहे. जिल्ह्यात इतर तालुक्‍यांत कोट्यवधी रुपयांचा निधी, तर आपल्या तालुक्‍याला लाखात निधी मिळाला. त्यामुळे भविष्यात तालुका विकासापासून दूर राहून उद्‌ध्वस्त होऊ नये, म्हणून तत्त्व बाजूला ठेवून, हृदयावर दगड ठेवून हा निर्णय घेत आहे.
- आमदार वैभव पिचड

News Item ID: 
599-news_story-1564164859
Mobile Device Headline: 
'वेळ पाहून' घड्याळ ठेवणार बाजूला - आमदार वैभव पिचड
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

Vertical Image: 
English Headline: 
MLA Vaibhav Pichad NCP Shivsena Politics
Author Type: 
External Author
सकाळ वृत्तसेवा
Search Functional Tags: 
आमदार, राष्ट्रवाद, women, सकाळ, Mumbai, Sachin Ahir, भारत, धरण, विकास, हृदय
Twitter Publish: 
Meta Keyword: 
MLA Vaibhav Pichad, NCP, Shivsena, Politics
Meta Description: 
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुंबई प्रदेशाध्यक्ष सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशापाठोपाठ "राष्ट्रवादी'चे आमदार वैभव पिचड यांनीही "राष्ट्रवादी'ला रामराम ठोकण्याचा आणि घड्याळ काढून ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
Send as Notification: