शिवसेनेचे खासदार मंडलिक यांचा बंटींच्या मेळाव्यात राक्षस गाडण्याचा निर्धार

कोल्हापूर - लोकसभा निवडणुकीत आमदार सतेज पाटील यांनी जे उपकार केले त्याची शतपटीने परतफेड येत्या विधानसभेत निवडणुकीत केली जाईल. माझ्या खासदारकीसाठी पाटील यांनी आपले जीवन पणाला लावले. राजकीय जुगार खेळला. त्यांच्या मागील पराभवाची जखम अजूनही भळभळत आहे. कोल्हापूरातील राजकारणातील राक्षस गाडूनच पराभवाचा वचपा काढू आणि ही प्रवृत्ती कायमची हद्दपार करू, अशी ग्वाही खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी आज दिली.  आमदार सतेज पाटील यांनी आयोजित केलेल्या कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्यात ते बोलत होते. पाटील यांच्या मेळाव्याला शिवसेनेच्या खासदारांनी उपस्थिती लावल्याने ते नेमके काय बोलणार याकडे लक्ष लागून राहिले होते. श्री.मंडलिक म्हणाले, या व्यासपीठावर जे जे आहेत त्यांनी सर्वांनी मिळून मला खासदार केले आहे. आमच ठरलंयचा पहिला भाग लोकसभा निवडणुकीत झाला, आता दूसरा भाग विधानसभेसाठी शिल्लक राहिला आहे. लोकसभा निवडणुकीत ही एक ट्रेलर होती. खासदार मंडलिक म्हणाले, 2014 ला सतेज पाटील यांचा पराभव झाला. त्याची जखम अजून भळभळत आहे. स्वाभिमानी कार्यकर्त्यांचा हा पराभव होता. पाटील यांना अनुमोदन देण्यासाठी मी येथे आलो आहे. लोकसभा निवडणुकीत निगवे गावापासून कोल्हापूर दक्षिणचा दौरा सुरू केला. मात्र कामाबाबत फार काही चांगले कानावर पडले नाही. पूर्वी सतेज पाटील तसेच आम्ही गोकुळसह सगळया निवडणुका एकत्रित लढविल्या. प्रत्येक निवडणुकीत स्वाभिमान जिवंत ठेवला. मी विरोधी पक्षात असलो तरी आमचा मित्रपक्ष कायम राहणार आहे. पराभवाचा वचपा काढण्याचा संधी चालून आली आहे. दक्षिणमध्ये मला 43 हजारांचे मताधिक्‍य मिळाले. सतेज पाटील जो उमेदवार देतील. तो 50 हजाराहून अधिक मताधिक्‍याने निवडून येईल, असेही खासदार मंडलिक म्हणाले.  लोकसभेवेळी भाकणूक लोकसभेवेळी खुपिरे येथे भाकणूक झाली होती. लोकसभा हातातून गेली तर गोकुळ आणि दक्षिणही हाती राहणार नाही अशा स्वरूपाची भाकणूक होती., असेही खासदार मंडलिक म्हणाले.  सोलापूरचेच राजकारण करतील असे वाटते ज्यांनी सोलापूरमध्ये भाजप प्रवेश केला आहे. यापुढे ते सोलापूरचेच राजकारण करतील असे वाटते, असेही खासदार मंडलिक म्हणाले.  राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांनी केला शिवसेनेचा प्रचार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार यांनी लोकसभा निवडणुकीत उघडपणे आपला प्रचार केल्याचे खासदार मंडलिक यांनी सांगितले. आमदार हसन मुश्रीफ यांनी लोकसभा राष्ट्रवादीकडून लढवावी, असा आग्रह केला होता. पण मी शिवसेनेतच योग्य असल्याचे सांगितले.  नव्या पिढीला आमच्याकडे द्या  ऋतुराज पाटील यांचे नाव न घेता नव्या पिढीला आमच्याकडे द्या, असे मंडलिक यांनी सांगताच टाळ्यांचा कडकडाट झाला. त्यास सतेज पाटील यांनी महाडिक यांच्यासारखे दलबदलू असा शिक्का आपल्याला नको. एका घरात दोन वेगवेगळे पक्ष नको असे उत्तर समारोपाच्या भाषणात दिले.    News Item ID: 599-news_story-1567686918Mobile Device Headline: शिवसेनेचे खासदार मंडलिक यांचा बंटींच्या मेळाव्यात राक्षस गाडण्याचा निर्धारAppearance Status Tags: Tajya NewsSite Section Tags: Paschim Maharashtra Mobile Body: कोल्हापूर - लोकसभा निवडणुकीत आमदार सतेज पाटील यांनी जे उपकार केले त्याची शतपटीने परतफेड येत्या विधानसभेत निवडणुकीत केली जाईल. माझ्या खासदारकीसाठी पाटील यांनी आपले जीवन पणाला लावले. राजकीय जुगार खेळला. त्यांच्या मागील पराभवाची जखम अजूनही भळभळत आहे. कोल्हापूरातील राजकारणातील राक्षस गाडूनच पराभवाचा वचपा काढू आणि ही प्रवृत्ती कायमची हद्दपार करू, अशी ग्वाही खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी आज दिली.  आमदार सतेज पाटील यांनी आयोजित केलेल्या कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्यात ते बोलत होते. पाटील यांच्या मेळाव्याला शिवसेनेच्या खासदारांनी उपस्थिती लावल्याने ते नेमके काय बोलणार याकडे लक्ष लागून राहिले होते. श्री.मंडलिक म्हणाले, या व्यासपीठावर जे जे आहेत त्यांनी सर्वांनी मिळून मला खासदार केले आहे. आमच ठरलंयचा पहिला भाग लोकसभा निवडणुकीत झाला, आता दूसरा भाग विधानसभेसाठी शिल्लक राहिला आहे. लोकसभा निवडणुकीत ही एक ट्रेलर होती. खासदार मंडलिक म्हणाले, 2014 ला सतेज पाटील यांचा पराभव झाला. त्याची जखम अजून भळभळत आहे. स्वाभिमानी कार्यकर्त्यांचा हा पराभव होता. पाटील यांना अनुमोदन देण्यासाठी मी येथे आलो आहे. लोकसभा निवडणुकीत निगवे गावापासून कोल्हापूर दक्षिणचा दौरा सुरू केला. मात्र कामाबाबत फार काही चांगले कानावर पडले नाही. पूर्वी सतेज पाटील तसेच आम्ही गोकुळसह सगळया निवडणुका एकत्रित लढविल्या. प्रत्येक निवडणुकीत स्वाभिमान जिवंत ठेवला. मी विरोधी पक्षात असलो तरी आमचा मित्रपक्ष कायम राहणार आहे. पराभवाचा वचपा काढण्याचा संधी चालून आली आहे. दक्षिणमध्ये मला 43 हजारांचे मताधिक्‍य मिळाले. सतेज पाटील जो उमेदवार देतील. तो 50 हजाराहून अधिक मताधिक्‍याने निवडून येईल, असेही खासदार मंडलिक म्हणाले.  लोकसभेवेळी भाकणूक लोकसभेवेळी खुपिरे येथे भाकणूक झाली होती. लोकसभा हातातून गेली तर गोकुळ आणि दक्षिणही हाती राहणार नाही अशा स्वरूपाची भाकणूक होती., असेही खासदार मंडलिक म्हणाले.  सोलापूरचेच राजकारण करतील असे वाटते ज्यांनी सोलापूरमध्ये भाजप प्रवेश केला आहे. यापुढे ते सोलापूरचेच राजकारण करतील असे वाटते, असेही खासदार मंडलिक म्हणाले.  राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांनी केला शिवसेनेचा प्रचार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार यांनी लोकसभा निवडणुकीत उघडपणे आपला प्रचार केल्याचे खासदार मंडलिक यांनी सांगितले. आमदार हसन मुश्रीफ यांनी लोकसभा राष्ट्रवादीकडून लढवावी, असा आग्रह केला होता. पण मी शिवसेनेतच योग्य असल्याचे सांगितले.  नव्या पिढीला आमच्याकडे द्या  ऋतुराज पाटील यांचे नाव न घेता नव्या पिढीला आमच्याकडे द्या, असे मंडलिक यांनी सांगताच टाळ्यांचा कडकडाट झाला. त्यास सतेज पाटील यांनी महाडिक यांच्यासारखे दलबदलू असा शिक्का आपल्याला नको. एका घरात दोन वेगवेगळे पक्ष नको असे उत्तर समारोपाच्या भाषणात दिले.

शिवसेनेचे खासदार मंडलिक यांचा बंटींच्या मेळाव्यात राक्षस गाडण्याचा निर्धार

कोल्हापूर - लोकसभा निवडणुकीत आमदार सतेज पाटील यांनी जे उपकार केले त्याची शतपटीने परतफेड येत्या विधानसभेत निवडणुकीत केली जाईल. माझ्या खासदारकीसाठी पाटील यांनी आपले जीवन पणाला लावले. राजकीय जुगार खेळला. त्यांच्या मागील पराभवाची जखम अजूनही भळभळत आहे. कोल्हापूरातील राजकारणातील राक्षस गाडूनच पराभवाचा वचपा काढू आणि ही प्रवृत्ती कायमची हद्दपार करू, अशी ग्वाही खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी आज दिली. 

आमदार सतेज पाटील यांनी आयोजित केलेल्या कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्यात ते बोलत होते. पाटील यांच्या मेळाव्याला शिवसेनेच्या खासदारांनी उपस्थिती लावल्याने ते नेमके काय बोलणार याकडे लक्ष लागून राहिले होते. श्री.मंडलिक म्हणाले, या व्यासपीठावर जे जे आहेत त्यांनी सर्वांनी मिळून मला खासदार केले आहे. आमच ठरलंयचा पहिला भाग लोकसभा निवडणुकीत झाला, आता दूसरा भाग विधानसभेसाठी शिल्लक राहिला आहे. लोकसभा निवडणुकीत ही एक ट्रेलर होती.

खासदार मंडलिक म्हणाले, 2014 ला सतेज पाटील यांचा पराभव झाला. त्याची जखम अजून भळभळत आहे. स्वाभिमानी कार्यकर्त्यांचा हा पराभव होता. पाटील यांना अनुमोदन देण्यासाठी मी येथे आलो आहे.

लोकसभा निवडणुकीत निगवे गावापासून कोल्हापूर दक्षिणचा दौरा सुरू केला. मात्र कामाबाबत फार काही चांगले कानावर पडले नाही. पूर्वी सतेज पाटील तसेच आम्ही गोकुळसह सगळया निवडणुका एकत्रित लढविल्या. प्रत्येक निवडणुकीत स्वाभिमान जिवंत ठेवला. मी विरोधी पक्षात असलो तरी आमचा मित्रपक्ष कायम राहणार आहे. पराभवाचा वचपा काढण्याचा संधी चालून आली आहे. दक्षिणमध्ये मला 43 हजारांचे मताधिक्‍य मिळाले. सतेज पाटील जो उमेदवार देतील. तो 50 हजाराहून अधिक मताधिक्‍याने निवडून येईल, असेही खासदार मंडलिक म्हणाले. 

लोकसभेवेळी भाकणूक

लोकसभेवेळी खुपिरे येथे भाकणूक झाली होती. लोकसभा हातातून गेली तर गोकुळ आणि दक्षिणही हाती राहणार नाही अशा स्वरूपाची भाकणूक होती., असेही खासदार मंडलिक म्हणाले. 

सोलापूरचेच राजकारण करतील असे वाटते

ज्यांनी सोलापूरमध्ये भाजप प्रवेश केला आहे. यापुढे ते सोलापूरचेच राजकारण करतील असे वाटते, असेही खासदार मंडलिक म्हणाले. 

राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांनी केला शिवसेनेचा प्रचार
राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार यांनी लोकसभा निवडणुकीत उघडपणे आपला प्रचार केल्याचे खासदार मंडलिक यांनी सांगितले. आमदार हसन मुश्रीफ यांनी लोकसभा राष्ट्रवादीकडून लढवावी, असा आग्रह केला होता. पण मी शिवसेनेतच योग्य असल्याचे सांगितले. 

नव्या पिढीला आमच्याकडे द्या 
ऋतुराज पाटील यांचे नाव न घेता नव्या पिढीला आमच्याकडे द्या, असे मंडलिक यांनी सांगताच टाळ्यांचा कडकडाट झाला. त्यास सतेज पाटील यांनी महाडिक यांच्यासारखे दलबदलू असा शिक्का आपल्याला नको. एका घरात दोन वेगवेगळे पक्ष नको असे उत्तर समारोपाच्या भाषणात दिले. 
 
News Item ID: 
599-news_story-1567686918
Mobile Device Headline: 
शिवसेनेचे खासदार मंडलिक यांचा बंटींच्या मेळाव्यात राक्षस गाडण्याचा निर्धार
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

Vertical Image: 
English Headline: 
Shivsena MP Sadashivrao Mandlik comment on Congress stage
Author Type: 
External Author
सकाळ वृत्तसेवा
Search Functional Tags: 
कोल्हापूर, पूर, Floods, लोकसभा, आमदार, सतेज पाटील, Satej Patil, वन, forest, खासदार, पराभव, defeat, राजकारण, Politics, भाजप, हसन मुश्रीफ, Hassan Mushriff, महाड, Mahad
Twitter Publish: 
Send as Notification: