सौदीत प्रथमच पुरुषांच्या मंजुरीविना महिला परदेशी जाऊ शकतील, लग्न-पासपोर्टसाठीही परवानगीची गरज नाही

रियाध - सौदी अरेबियात व्हिजन 2030 अंतर्गत राजकुमार मोहंमद बिन सलमान यांनी महिलांच्या अधिकारासाठी आणखी एक क्रांतीकारी पाऊल उचलले आहे. यापुढे सौदीतील महिलांना प्रवास करण्यासाठी किंवा परदेशात जाण्यासाठी आपल्या परुष गार्डियनच्या परवानगीची गरज राहणार नाही. यापूर्वी महिलांना प्रौढ वयात सुद्धा अल्पवयीन असाच दर्जा होता. अर्थात 40 वर्षांच्या महिलेला सुद्धा दुसऱ्या देशांत जाण्यासाठी येथील पती, भाऊ किंवा वडिलांची परवानगी घेणे बंधनकारक होते. सौदी अरेबिया शासनाने तीच अट आता हद्दपार केली आहे.परवानगीशिवाय लग्न करण्याची देखील दिली सूटसरकारी दैनिक ओकाजच्या वृत्तानुसार, सौदी अरबच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या आदेशाची घोषणा केली. त्यानुसार, 21 वर्षे वय असलेल्या महिलांना आता पासपोर्ट दिला जाईल. एवढेच नव्हे, तर त्यांना विवाह देखील करता येईल. यासाठी त्यांना कुठल्याही पुरुष गार्डियनच्या परवानगीची गरज राहणार नाही. त्यांची परवानगी न घेताच त्या देश सोडून दुसरीकडे प्रवास करू शकतील. वॉशिंग्टनमध्ये अरब गल्फ स्टेट्स इंस्टीट्युटच्या ख्रिस्टीन दीवान यांच्या मते, या महिलांच्या स्वातंत्र्य आणि हक्कांसाठी हा महत्वाचा निर्णय आहे. हा नियम देशात पूर्णपणे लागू झाल्यास महिलांचे आयुष्य सुकर करण्यात हा सर्वात मोठा निर्णय ठरेल. सौदी अरेबियातील मानवाधिकार संघटनांनी सुद्धा यावर आनंद व्यक्त केला. कित्येक वर्षांपासून आपल्या मूलभूत अधिकारांसाठी झटणाऱ्या त्या सर्वच महिलांचा हा विजय आहे. लूजेन अल-हथलूल यांनी याच आठवड्यात तुरुंगात आपला 30 वा वाढदिवस साजरा केला. कारण, एवढेच की त्यांनी महिलांच्या मूलभूत अधिकारांसाठी आवाज बुलंद केला होता. त्यांच्यासारख्याच इतर महिला कार्यकर्त्या सुद्धा अजुनही तुरुंगात आहेत.गतवर्षीच सौदीत महिलांना मिळाला ड्रायव्हिंगचा अधिकारसौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहंमद बिन सलमान यांनी सत्तेवर आल्यानंतर आतापर्यंत महिलांच्या अधिकारांसाठी अनेक निर्णय घेतले. दोन वर्षांपूर्वीच त्यांनी महिलांना फुटबॉल स्टेडिअममध्ये बसून सामने पाहण्याची परवानगी दिली. आश्चर्याची बाब म्हणजे, सौदीत यावर सुद्धा महिलांना बंधने होती. यानंतर त्यांनी गतवर्षी जूनमध्ये महिलांना ड्रायव्हिंग करण्याची सूट दिली. महिलांना ड्रायव्हिंग लायसेन्स मिळवण्याचा अधिकार दिला. त्यापूर्वी सौदीत ड्रायव्हिंग करणाऱ्या कित्येक महिलांना थेट तुरुंगात डांबण्यात आले होते.व्हिजन 2030 चा परिणामसौदी अरेबिया जगातील सर्वात कट्टरपंथी देशांपैकी एक मानला जातो. येथे महिलांसह पुरुषांसाठी देखील कायदे अतिशय कठोर आहेत. परंतु, सौदीचे राजपुत्र मोहंमद बिन सलमान यांनी व्हिजन 2030 अंतर्गत देशात अमुलाग्र आणि क्रांतिकारी बदल घडवण्यास सुरुवात केली. त्यानुसार, स्थानिक लोकांना जास्तीत-जास्त रोजगाराच्या संधी आणि महिलांना मूलभूत अधिकार असे बदल घडवले जात आहेत. Download Dainik Bhaskar App to read Latest Hindi News Today Saudi Arabia allows women to travel without male guardians approval


 सौदीत प्रथमच पुरुषांच्या मंजुरीविना महिला परदेशी जाऊ शकतील, लग्न-पासपोर्टसाठीही परवानगीची गरज नाही

रियाध - सौदी अरेबियात व्हिजन 2030 अंतर्गत राजकुमार मोहंमद बिन सलमान यांनी महिलांच्या अधिकारासाठी आणखी एक क्रांतीकारी पाऊल उचलले आहे. यापुढे सौदीतील महिलांना प्रवास करण्यासाठी किंवा परदेशात जाण्यासाठी आपल्या परुष गार्डियनच्या परवानगीची गरज राहणार नाही. यापूर्वी महिलांना प्रौढ वयात सुद्धा अल्पवयीन असाच दर्जा होता. अर्थात 40 वर्षांच्या महिलेला सुद्धा दुसऱ्या देशांत जाण्यासाठी येथील पती, भाऊ किंवा वडिलांची परवानगी घेणे बंधनकारक होते. सौदी अरेबिया शासनाने तीच अट आता हद्दपार केली आहे.

परवानगीशिवाय लग्न करण्याची देखील दिली सूट
सरकारी दैनिक ओकाजच्या वृत्तानुसार, सौदी अरबच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या आदेशाची घोषणा केली. त्यानुसार, 21 वर्षे वय असलेल्या महिलांना आता पासपोर्ट दिला जाईल. एवढेच नव्हे, तर त्यांना विवाह देखील करता येईल. यासाठी त्यांना कुठल्याही पुरुष गार्डियनच्या परवानगीची गरज राहणार नाही. त्यांची परवानगी न घेताच त्या देश सोडून दुसरीकडे प्रवास करू शकतील. वॉशिंग्टनमध्ये अरब गल्फ स्टेट्स इंस्टीट्युटच्या ख्रिस्टीन दीवान यांच्या मते, या महिलांच्या स्वातंत्र्य आणि हक्कांसाठी हा महत्वाचा निर्णय आहे. हा नियम देशात पूर्णपणे लागू झाल्यास महिलांचे आयुष्य सुकर करण्यात हा सर्वात मोठा निर्णय ठरेल. सौदी अरेबियातील मानवाधिकार संघटनांनी सुद्धा यावर आनंद व्यक्त केला. कित्येक वर्षांपासून आपल्या मूलभूत अधिकारांसाठी झटणाऱ्या त्या सर्वच महिलांचा हा विजय आहे. लूजेन अल-हथलूल यांनी याच आठवड्यात तुरुंगात आपला 30 वा वाढदिवस साजरा केला. कारण, एवढेच की त्यांनी महिलांच्या मूलभूत अधिकारांसाठी आवाज बुलंद केला होता. त्यांच्यासारख्याच इतर महिला कार्यकर्त्या सुद्धा अजुनही तुरुंगात आहेत.


गतवर्षीच सौदीत महिलांना मिळाला ड्रायव्हिंगचा अधिकार
सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहंमद बिन सलमान यांनी सत्तेवर आल्यानंतर आतापर्यंत महिलांच्या अधिकारांसाठी अनेक निर्णय घेतले. दोन वर्षांपूर्वीच त्यांनी महिलांना फुटबॉल स्टेडिअममध्ये बसून सामने पाहण्याची परवानगी दिली. आश्चर्याची बाब म्हणजे, सौदीत यावर सुद्धा महिलांना बंधने होती. यानंतर त्यांनी गतवर्षी जूनमध्ये महिलांना ड्रायव्हिंग करण्याची सूट दिली. महिलांना ड्रायव्हिंग लायसेन्स मिळवण्याचा अधिकार दिला. त्यापूर्वी सौदीत ड्रायव्हिंग करणाऱ्या कित्येक महिलांना थेट तुरुंगात डांबण्यात आले होते.


व्हिजन 2030 चा परिणाम
सौदी अरेबिया जगातील सर्वात कट्टरपंथी देशांपैकी एक मानला जातो. येथे महिलांसह पुरुषांसाठी देखील कायदे अतिशय कठोर आहेत. परंतु, सौदीचे राजपुत्र मोहंमद बिन सलमान यांनी व्हिजन 2030 अंतर्गत देशात अमुलाग्र आणि क्रांतिकारी बदल घडवण्यास सुरुवात केली. त्यानुसार, स्थानिक लोकांना जास्तीत-जास्त रोजगाराच्या संधी आणि महिलांना मूलभूत अधिकार असे बदल घडवले जात आहेत.



Download Dainik Bhaskar App to read Latest Hindi News Today
Saudi Arabia allows women to travel without male guardians approval