स्लोव्हेनियात मेलेनिया ट्रम्प यांचा लाकडी पुतळा; लाेक म्हणाले- जशी फर्स्ट लेडी ऑफ अमेरिका तसाच तिचा तकलादू पुतळा

स्लोव्हेनिया-अमेरिकी प्रथम महिला मेलेनिया ट्रम्प यांच्या लाकडी पुतळ्याचे शुक्रवारी त्यांच्या स्लोव्हेनिया या देशात अनावरण करण्यात आले. मात्र, हा प्रकार अमेरिकींना आवडलेला नाही. त्यांनी याची तुलना स्मर्फ या विनोदी पात्राशी याची तुलना केली. तर काही लोकांनी मेलेनिया यांची टर उडवण्यास सुरुवात केली. खरी मेलेनिया पुतळ्यापेक्षाही जास्त तकलादू आहे. तिच्या हावभावांवरून ती कायम चर्चेत असते.हा लाकडी पुतळा अॅलेस झुपकेव्ह यांनी तयार केला आहे. याची जबाबदारी अमेरिकी आर्टिस्ट ब्रॅड डाऊनी यांनी दिली होती. जानेवारी २०१७ मध्ये पती डोनाल्ड ट्रम्प यांच्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या सोहळ्यात मेलेनिया यांनी जो ड्रेस परिधान केला होता, तसाच त्यांचा पुतळा करण्यात आला आहे. हा पुतळा त्यांच्या गावी म्हणजे सेव्हनिकापासून पाच किमी दूर असलेल्या रोजनो गावात उभारण्यात आला आहे. या पुतळ्याच्या अनावरणास ३० लाेकांची उपस्थिती होती. हा पुतळा पाहून त्यांना धक्काच बसला. मेलेनिया यांचा हा अवमान असल्याचे मत काही लोकांनी व्यक्त केले. तर काहींनी यावर टि्वटरवर टीकाही केली. Download Dainik Bhaskar App to read Latest Hindi News Today Wooden statue of Melania Trump in Slovenia


 स्लोव्हेनियात मेलेनिया ट्रम्प यांचा लाकडी पुतळा; लाेक म्हणाले- जशी फर्स्ट लेडी ऑफ अमेरिका तसाच तिचा तकलादू पुतळा

स्लोव्हेनिया-अमेरिकी प्रथम महिला मेलेनिया ट्रम्प यांच्या लाकडी पुतळ्याचे शुक्रवारी त्यांच्या स्लोव्हेनिया या देशात अनावरण करण्यात आले. मात्र, हा प्रकार अमेरिकींना आवडलेला नाही. त्यांनी याची तुलना स्मर्फ या विनोदी पात्राशी याची तुलना केली. तर काही लोकांनी मेलेनिया यांची टर उडवण्यास सुरुवात केली. खरी मेलेनिया पुतळ्यापेक्षाही जास्त तकलादू आहे. तिच्या हावभावांवरून ती कायम चर्चेत असते.हा लाकडी पुतळा अॅलेस झुपकेव्ह यांनी तयार केला आहे. याची जबाबदारी अमेरिकी आर्टिस्ट ब्रॅड डाऊनी यांनी दिली होती. जानेवारी २०१७ मध्ये पती डोनाल्ड ट्रम्प यांच्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या सोहळ्यात मेलेनिया यांनी जो ड्रेस परिधान केला होता, तसाच त्यांचा पुतळा करण्यात आला आहे. हा पुतळा त्यांच्या गावी म्हणजे सेव्हनिकापासून पाच किमी दूर असलेल्या रोजनो गावात उभारण्यात आला आहे. या पुतळ्याच्या अनावरणास ३० लाेकांची उपस्थिती होती. हा पुतळा पाहून त्यांना धक्काच बसला. मेलेनिया यांचा हा अवमान असल्याचे मत काही लोकांनी व्यक्त केले. तर काहींनी यावर टि्वटरवर टीकाही केली.



Download Dainik Bhaskar App to read Latest Hindi News Today
Wooden statue of Melania Trump in Slovenia