अग्रलेख / दि. ११ फेब्रुवारी २०२५
बिरेन सिंह यांचा राजीनामा
मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी दिल्लीला जाऊन गृहमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांची नुकतीच भेट घेतली. रविवारी बिरेन सिंह यांनी इम्फाळ येथील राजभवनात राज्यपाल अजय कुमार भल्ला यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. ३ मे २०२३ रोजी ईशान्येकडील मणिपूर राज्यात वांशिक हिंसाचार उसळला होता. तेव्हापासून राज्यात तणावाची परिस्थिती आहे. राज्यातील स्थिती अजूनही सुधारलेली नाही. यावरून मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्यावर अनेकदा टीकाही करण्यात आली. मणिपूरच्या मुख्यमंत्री कार्यालयातील बिरेन सिंह यांचे वैयक्तिक सहाय्यक दीपक शिजागुरुमायुम यांनी राजीनाम्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. एन. बिरेन सिंह यांच्या राजीनाम्यावर मणिपूर विधानसभेचे नियोजित अधिवेशन स्थगित करण्यात आले आहे. या अधिवेशनात काँग्रेस पक्ष भाजप सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या तयारीत होता. परंतु त्यापूर्वीच बिरेन सिंह यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे.
बऱ्याच काळापासून वांशिक हिंसाचारात मणिपूर राज्य जळत आहे. यावेळी अनेक जणांची हत्या झाली आणि इंफाळ खोऱ्यातील आमदार-मंत्र्यांच्या घरांवरही हल्ले झाले. त्यावेळी सर्व परिस्थिति नियंत्रणाबाहेर होती. मणिपूर विधानसभेच्या आगामी अधिवेशनात काँग्रेस पक्ष भाजप सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या तयारीत होता. परंतु त्यापूर्वीच बिरेन सिंह यांनी राजभवनात जाऊन मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. एन. बिरेन सिंह २०१७ पासून मणिपूरचे मुख्यमंत्री होते. त्यांच्या नेतृत्वाखालील मणिपूरमध्ये दुसऱ्यांदा भाजपचे सरकार आले. गेल्या काही महिन्यांत मणिपूरमध्ये पुन्हा झालेल्या हिंसाचारामुळे अनेकदा विरोधकांनी बिरेन सिंह यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यांच्यावर हिंसाचार नियंत्रित करण्यात अपयश आल्याचा आरोप करण्यात आला होता.
मणिपूरमधल्या कुकी आणि मैतेई या दोन समाजांमध्ये 3 मे 2023 ला आरक्षणावरून संघर्ष सुरू झाला. त्यानंतर एन. बिरेन सिंह यांच्यावर विरोधकांकडून टीका झाली होती. सिंह यांच्यासोबत भाजप आणि एनपीएफ (नागा पीपल्स फ्रंटचे) इतर १४ आमदारही राजभवनात उपस्थित होते. या शिष्टमंडळात भाजपचे मणिपूर प्रदेशाध्यक्ष ए. शारदा आणि पक्षाचे खासदार संबित पात्रा हे देखील उपस्थित होते. २०१७ पासून एन. बिरेन सिंह मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली मणिपूरमध्ये भाजप सरकारचा हा सलग दुसरा कार्यकाळ आहे. परंतु गेल्या काही महिन्यांत मणिपूरमध्ये झालेल्या मोठ्या हिंसाचारामुळे बिरेन सिंह यांच्यावर विरोधकांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले.
भारताच्या ईशान्येकडील मणिपूर राज्य मे २०२३ पासून हिंसाचाराने होरपळून निघत आहे. कुकी आणि मैतेई या दोन समुदायांमधील हिंसाचारामुळे येथे शेकडो लोकांचे प्राण गेले. तेव्हापासून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मणिपूरमध्ये मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. हिंसाचार नियंत्रित करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप विरोधकांनी वारंवार केला आहे तसेच बिरेन सिंह यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे. मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू झाल्यानंतर काही दिवसांनी बिरेन सिंग राजीनामा देतील, असा अंदाज व्यक्त होत होता. मात्र, बिरेन सिंह यांनी त्यावेळी राजीनामा देण्यास नकार दिला होता. एकेकाळी मणिपूरमधील फुटबॉल खेळाडू म्हणून राष्ट्रीय ख्याती मिळवणारे नोंगथोम्बम बिरेन सिंह हे २०१७ मध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारचे मुख्यमंत्री बनले. जेमतेम ६० जागांच्या मणिपूर विधानसभेत, २०१७ मध्ये भाजपला फक्त २१ जागा मिळाल्या होत्या, परंतु २८ जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला मागे टाकत बिरेन सिंह यांनी राज्यात सरकार स्थापन केले. मणिपूरमध्ये १९६३ नंतर १२ मुख्यमंत्री झाले, त्यापैकी सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री राहिलेल्या काँग्रेसच्या ओकराम इबोबी सिंह यांचा कार्यकाळ सलग १२ वर्षांचा होता.
याच ओकराम इबोबी सिंह यांच्याकडून बिरेन सिंह यांनी राजकारणाचे धडे गिरवले. त्यानंतर मुख्यमंत्रिपदापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी त्यांचे नेते ओकराम इबोबी सिंह यांच्याविरुद्ध आणि पक्षाविरुद्ध बंड केले. मैतेई समुदायातून येणारे बिरेन सिंह यांनी मणिपूर विद्यापीठातून बीए ची पदवी प्राप्त केल्यानंतर पत्रकारितेत डिप्लोमादेखील केला आहे. १ जानेवारी १९६१ रोजी इम्फाळ पूर्व जिल्ह्यातील लुवांगसांगबम मामांग लीकाई गावात बिरेन सिंह यांचा जन्म झाला. ते मणिपूरमधील प्रख्यात फुटबॉलपटू होते. ते देशाबाहेरही फुटबॉल स्पर्धेत खेळले होते.
१९७२ साली मणिपूरला राज्याचा दर्जा मिळाल्यापासून राजकीय अस्थिरतेमुळे १८ वेळा येथील सरकारे बदलली आहेत. अशा परिस्थितीत ओकराम इबोबी सिंह यांना अशा एका सहकाऱ्याची गरज होती. २००३ साली बिरेन सिंह यांच्या रूपाने त्यांचा शोध पूर्ण झाला. इबोबी यांनी बिरेन सिंह यांना काँग्रेसमध्ये सामील करून घेतळे आणि त्यांना त्यांच्या मंत्रिमंडळात स्थान दिले. अशाप्रकारे, ते इबोबी सरकारमध्ये पहिल्यांदाच दक्षता विभागात राज्यमंत्री झाले. बीरेन सिंह यांनी २००२ मध्ये राजकारणात प्रवेश केला. फुटबॉल खेळाडू आणि पत्रकार म्हणून मिळालेल्या प्रसिद्धीचा फायदा त्यांना राजकारणात झाला. त्यांनी डेमोक्रॅटिक रिव्होल्यूशनरी पीपल्स पार्टीच्या वतीने विधानसभा निवडणूक लढवली आणि पहिल्याच प्रयत्नात हिंगांग विधानसभेत विजय मिळवला. पण इबोबी यांनी बिरेन यांच्या तिसऱ्या कार्यकाळात स्वतःला त्यांच्यापासून दूर केले होते. त्यावेळी बिरेन सिंह हे काँग्रेसमधील बडे नेते समजले जात असत.
इबोबी आणि बिरेन सिंह यांच्यातील मतभेद वाढू लागले, तेव्हा काँग्रेस पक्षाने त्यांना शांत करण्यासाठी बिरेन सिंह यांना मणिपूर काँग्रेसचे उपाध्यक्ष बनवले. मात्र, इबोबी सिंह यांच्यासोबतचा त्यांचा संघर्ष कमी झाला नाही. २०१२ मध्ये जेव्हा इबोबी सिंह यांनी तिसऱ्यांदा राज्यात सरकार स्थापन केले, तेव्हा बिरेन सिंह यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्यात आले. २०१६ मध्ये आसाम आणि नंतर अरुणाचल प्रदेशात सरकार स्थापन केल्यानंतर, भाजपची नजर मणिपूरवर होती. भाजप मणिपूरमध्ये इबोबी सिंह यांना हरवू शकेल अशा नेत्याच्या शोधात होता. भाजपच्या दृष्टीने त्यासाठी मणिपूरमधील बिरेन सिंह हे एकमेव योग्य नेते होते. ऑक्टोबर २०१६ मध्ये भाजपने बिरेन सिंह यांना पक्षात घेण्यात यश मिळवले. नंतर २०१७ मध्ये ते पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले. विरोधकांनी मणीपुर हिंसाचाराचा ठपका बिरेन सिंह यांच्यावर ठेवला होता.