महिला मेळावा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे कराडमध्ये बुधवारी आयोजन
कराड/प्रतिनिधी : –
जागतिक महिला दिन व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त बुधवार (दि. १२) मार्च रोजी सकाळी १० वाजता हॉटेल सत्यजित विट्स, वारुंजी फाटा, कराड येथे महिला मेळावा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कराड दक्षिण महिला काँग्रेस कमिटी व सत्यजित पतसंस्था, वारुंजी यांच्यावतीने अयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्याचे अध्यक्षस्थान राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (बाबा) भूषवणार आहेत. तर प्रा. मानसी दिवेकर या प्रमुख वक्त्या उपस्थित महिलांना बहुमूल्य मार्गदर्शन करणार आहेत. तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस एड. उदयसिंह पाटील-उंडाळकर हे आहेत.
तसेच या कार्यक्रमास कराड दक्षिण तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोहर शिंदे, सातारा जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सौ. अल्पना यादव, धनलक्ष्मी सखी परिवाराचे अध्यक्षा सौ. अरुणा चव्हाण, कराड दक्षिण महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सौ. विद्या थोरवडे, माजी पंचायत समिती सदस्य नामदेवराव पाटील, सत्यजित ग्रुपच्या डायरेक्टर भाग्यश्री पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तरी या कार्यक्रमास महिलांसह, पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने नामदेव पाटील (आप्पा) यांनी केले आहे.