कराड/प्रतिनिधी : –
सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या मतमोजणी ११.४५ वाजण्याच्या सुमारास प्रत्यक्ष सुरुवात झाली. मतपत्रिकांची विभागणी केल्यानंतर निवडणुक निर्णय अधिकारी संजयकुमार सुद्रीक आणि सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी अपर्णा यादव यांच्या आदेशाने मतमोजणी सुरुवात करण्यात आली.
सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या इतिहासात पहिल्यांदाच तिरंगी लढत झाल्याने या निवडणुकीसाठी
सुमारे 81 टक्के इतके विक्रमी मतदान झाले होते. त्यामुळे मतदानाच्या या वाढलेल्या टक्क्याचा सत्ताधाऱ्यांना फायदा होणार की विरोधकांना? याबाबतची उत्सुकता कमालीची ताणली गेली आहे. त्यामुळे या मतमोजणीच्या पहिल्या टप्प्याचा निकाल हाती आल्यानंतर निकालाचा प्रारंभिक कल समोर येणार आहे. जसजसे मत फेऱ्या वाढत जातील, तस तसा हा कल अंतिम होणार असल्याने मतदार सभासदांच्या प्रारंभी निकालाकडे नजरा लागले आहेत.
दरम्यान, या संपूर्ण मतदान प्रक्रियेत सर्व 99 मतदान केंद्रांवर अत्यंत शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली होती. परंतु, या निवडणुकीत कमालीची टशन दिसून आल्याने मतमोजणी व निकालावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी अत्यंत चोख बंदोबस्त ठेवला आहे.