spot_img
spot_img
spot_img
spot_img

कराड दक्षिणमध्ये 48 हजार बोगस मतदान – भानुदास माळी

कराड/प्रतिनिधी : –

कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात तब्बल 48 हजार बोगस मतदान झाल्याचे सवेत समोर आले आहे. त्यामुळे कराड दक्षिणसह संपूर्ण जिल्हाभरात अशा प्रकारे बोगस मतदान झाल्याची शक्यता असून, ते सर्व मतदान रद्द करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन उभारण्यात येणार असल्याचा इशारा महाराष्ट्र काँग्रेस ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी दिला.

बोगस मतदानासंदर्भात भानुदास माळी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसतर्फे प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.

श्री. माळी म्हणाले, बोगस मतदानासंदर्भात प्रांतधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर आमच्या प्रश्नांवर त्यांनी दिलेल्या कोणत्याही उत्तरावर आम्ही समाधानी नाही. ज्या अधिकाऱ्यांनी बोगस मतदानाचा घोळ केला आहे, त्यांच्यावर कारवाई होणार का? या प्रश्नावर ते चकार शब्द बोलत नाहीत. त्यांनी यासंदर्भात दिलेली सर्व उत्तरे भाजप प्रवक्ता असल्यासारखी दिल्याबद्धल श्री. माळी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी वाचा उद्याचा दैनिक प्रीतिसंगम…  

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या