डॉ. राहुल फासे; श्री छत्रपती शिवाजी उद्यानात गप्पांगण कार्यक्रम उत्साहात
कराड/प्रतिनिधी : –
नेत्रदान हेच खरे सर्वश्रेष्ठ दान. मृत्यूनंतर पाच ते सहा तासांत नेत्रदान होऊ शकते. अंध व्यक्तीही नेत्रदान करू शकते. मात्र, यासाठी फॉर्म भरून ठेवणे आणि त्याची माहिती कुटुंबीय व नातेवाईकांना असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन कराडचे सुप्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. राहुल फासे यांनी केले.
येथील श्री छत्रपती शिवाजी उद्यानात गुरुवारी झालेल्या गप्पांगण कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सोसायटीच्या चेअरमन सुनिताताई जाधव होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रशेखर नकाते उपस्थित होते.
डॉ. फासे म्हणाले, कॉम्प्युटर, मोबाईल व लॅपटॉपच्या अतिवापरामुळेही डोळ्यांना हानी पोहोचते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. “वीस मिनिटे कामानंतर वीस सेकंद विश्रांती घ्यावी, दीड फूट अंतर ठेवावे, वारंवार पापण्यांची उघडझाप करावी व झोपण्यापूर्वी डोळे स्वच्छ करावेत,” असा सल्ला त्यांनी दिला.
आज भारत ‘डायबेटिसची राजधानी’ बनला आहे, असे का म्हणाले डॉ. फासे!… सविस्तर वृत्तासाठी वाचा उद्याचा दैनिक प्रीतिसंगम…