spot_img
spot_img
spot_img
spot_img

कवठेएकंद शोभेच्या दारूचा स्फोट

आठजण जखमी; दोघांची प्रकृती चिंताजनक
सांगली/ प्रतिनिधी
 दसऱ्याच्या दिवशी शोभेच्या दारू आतषबाजी कामासाठी फटाकेचे काम करत असताना कवठेएकंद (ता. तासगाव) येथे रविवारी दारूचा स्फोट होऊन झालेल्या दुर्घटनेत आठ जण जखमी झाले असून यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.
एका मंडळाचे कार्यकर्ते शोभेची दारू तयार करत असताना अचानक तयार दारूने पेट घेतल्याने स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यामध्ये आशुतोष बाळासाहेब पाटील (वय १६), आनंद नारायण यादव (वय ५५), विवेक आनंदराव पाटील (वय ३८), गजानन शिवाजी यादव (वय २८), अंकुश शामराव घोडके (वय २१), प्रणव रवींद्र आराधे (वय २१), ओमकार रवींद्र सुतार (वय २१) आणि सौरभ सुहास कुलकर्णी (वय २७) हे आठ जण भाजून जखमी झाले आहेत. यापैकी दोघांना किरकोळ दुखापत झाली असून अन्य सहा जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयात दाखल असलेल्या दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. सर्व जखमींवर सांगलीतील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
गावातील ब्राह्मण गल्लीमध्ये एका पत्र्याच्या शेडमध्ये दारू तयार करण्याचे काम सुरू होते. दारूची चाचणी घेत असताना अचानक स्फोट होऊन तयार झालेल्या दारूने पेट घेतला. यावेळी ही दुर्घटना घडली. यात वरील आठ जण जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी रुग्णवाहिकेतून रुग्णालयात पाठवले.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या