spot_img
spot_img
spot_img
spot_img

सह्याद्रीच्या जंगलात नव्या ‘शिलेदार’ची एन्ट्री

व्याघ्र प्रकल्पात आता सात वाघांचा दरारा!

कराड/प्रतिनिधी:-
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पासाठी अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. प्रकल्प क्षेत्रात आणखी एका नवीन नर वाघाची अधिकृत नोंद झाली असून, त्याला ‘डढठ ढ9’ असा सांकेतिक क्रमांक देण्यात आला आहे. स्थानिक गाईड मंडळींनी या वाघाचे ‘शिलेदार’ असे नामकरण केले आहे. या नव्या वाघाच्या आगमनामुळे सह्याद्रीतील एकूण वाघसंख्या आता सातवर पोहोचली आहे.
हा नवीन नर वाघ गेल्या दोन महिन्यांपासून चांदोली नॅशनल पार्क परिसरातील विविध कॅमेरा ट्रॅपमध्ये सातत्याने दिसून येत आहे. त्याचे स्पष्ट फोटो आणि व्हिडिओ वन विभागाच्या कॅमेरात कैद झाले असून, त्यानंतर त्याची ओळख निश्चित करण्यात आली.
सध्या ढ9 ‘शिलेदार’ हा ढ5 ‘तारा’ या वाघिणीच्या अधिवासात फिरताना दिसत आहे. विशेष म्हणजे तारा वाघिणीच्या क्षेत्रात आधीपासूनच दोन नर वाघांची वर्दळ आहे. त्यामुळे या परिसरातील हालचालींना अधिक वेग आला आहे.
याबाबत प्रतिक्रिया देताना सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक तुषार चव्हाण म्हणाले, सध्या प्रकल्पातील ढ5 (तारा) ह्या वाघिणीच्या क्षेत्रात ढ1 ‘सेनापती’, ढ2 ‘सुभेदार’ आणि नव्याने नोंद झालेला ढ9 ‘शिलेदार’ हे तीन नर वाघ फिरताना आढळत आहेत. तारा भविष्यात कोणत्या नराची निवड करते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
वन्यजीव अभ्यासकांच्या मते, एखाद्या सक्षम वाघिणीच्या क्षेत्रात एकापेक्षा अधिक नरांची उपस्थिती ही त्या भागातील परिसंस्थेची ताकद दर्शवते. यामुळे प्रजननाची शक्यता वाढते आणि वाघसंख्येच्या स्थैर्यास हातभार लागतो.

नैसर्गिक कॉरिडॉर सक्षम
वन्यजीव तज्ज्ञांच्या मते, विविध अभयारण्ये आणि जंगल पट्ट्यांना जोडणारे नैसर्गिक कॉरिडॉर सक्षम राहिल्यास वाघांचे स्थलांतर सुलभ होते, नवीन नरांची एंट्री होते आणि आनुवंशिक विविधता टिकून राहते.

सह्याद्रीतील सात वाघांची नावे
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील सध्या नोंद असलेले वाघ पुढीलप्रमाणे;
ढ1 – सेनापती, ढ2 – सुभेदार, ढ3 – बाजी, ढ4 – चंदा, ढ5 – तारा, ढ6 – हिरकणी, ढ9 – शिलेदार या सर्व वाघांच्या हालचालींवर वन विभागाकडून बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

अगोदर सेनापती’ आणि ’चंदा’चे सूत जुळले! आता तारा चे सूत कोणाबरोबर जुळणार?
सह्याद्री व्याघ्र राखीवमध्ये सद्यस्थितीत सुरु असलेल्या वाघांचे संनियत्रण पथकाच्या निरिक्षणावरुन व कॅमेरा ट्रॅपमध्ये कैद झालेल्या चांदोली वन्यजीव विभागांतर्गत वनपरिक्षेत्र आंबामध्ये सेनापती व चंदा यांचा सोबत वावर असल्याचे सिध्द झाले आहे. त्यांचा एकत्रीत वावर हा जंगलातील नैसर्गिक वर्तनाचा एक भाग असुन, प्रजनन प्रक्रियेच्या दुष्टीने सह्याद्री व्याघ्र राखीवसाठी ही बाब अतिशय महत्वपुर्ण मानली जात आहे.सेनापती व चंदा या नर-मादी वाघांचे सोबत वावरामुळे सह्याद्रीमध्ये लवकरच वाघांची नैसर्गिक संख्या वृंदिगत होण्यास मदत होणार आहे.आता तारा चे सूत कोणाबरोबर जुळणार?

संवर्धनाच्या प्रयत्नांना यश
सह्याद्री परिसरातील वाढती वाघसंख्या ही वन विभाग, स्थानिक प्रशासन आणि वन्यजीवप्रेमी यांच्या संयुक्त प्रयत्नांचे फलित मानले जात आहे. कॅमेरा ट्रॅप, नियमित पगमार्क सर्वेक्षण आणि अधिवास संरक्षण यामुळे प्रकल्पातील वाघांची अचूक नोंद व देखरेख शक्य होत आहे. नव्या ‘शिलेदार’च्या आगमनामुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात उत्साहाचे वातावरण असून, आगामी काळात या वाघांच्या हालचाली आणि संभाव्य प्रजननावर सर्वांचे लक्ष लागले आहे.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सह्याद्रीच्या जंगलात ’तारा’ वाघिणीने आपल्या अचाट साहसाने वनविभागाच्या अधिकार्‍यांनाही थक्क केले होते. मोठ्या मगरींचा वावर असलेल्या वारणा धरणाच्या अथांग बॅकवॉटरमध्ये तब्बल दीड किलोमीटरचे अंतर अवघ्या 45 मिनिटांत न थांबता पोहून पार करत ताराने राज्यातील व्याघ्र संवर्धनाच्या इतिहासात एका ऐतिहासिक नोंदीची भर घातली आहे.ताडोबा येथून आणलेल्या ’तारा’ला 9 डिसेंबर रोजी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सोडण्यात आले होते. 18 डिसेंबरला ती विलग्न वासाच्या पिंजर्‍यातून बाहेर पडून अधिवासाच्या शोधात बाहेर पडली. हि धाडसी वाघीण कोणाच्या प्रेमात पडते हे पाहुया!

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या