spot_img
spot_img
spot_img
spot_img

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे नूतन सभापती आनंदराव नलवडे

ईश्वरपूर / प्रतिनिधी

सांगली जिल्ह्यातील एक महत्वाची संस्था समजल्या जाणाऱ्या सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे नूतन सभापती, कसबे डिग्रज येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आनंदराव नलवडे (भाऊ ) यांनी आपल्या समर्थक सहकाऱ्यांच्यासह राजारामबापू सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर येऊन स्व.बापूंच्या पुतळ्यास अभिवादन केले. माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांचे नेतृत्व आणि लोकनेते राजारामबापू पाटील यांचा आदर्श डोळ्यसमोर ठेवून शेतकऱ्यांचे हित जोपासत बाजार समिती च्या प्रगतीला चालना देवू,असा विश्वास त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील,जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील,तालुकाध्यक्ष विजयराव पाटील,महिला जिल्हाध्यक्षा सुस्मिता जाधव, युवक तालुकाध्यक्ष संग्राम जाधव,कार्याध्यक्ष देवराज देशमुख,खाजगी सचिव मोहन चव्हाण, सचिन पाटील यांनी सभापतीच्यासह सर्वाचे कारखाना कार्यस्थळावर जोरदार स्वागत केले.
आनंदराव नलवडे म्हणाले,आमचे नेते आ. जयंतराव पाटील,खा.विशाल पाटील,आ.विश्वजित कदम,आ.रोहित पाटील,माजी मंत्री अजितराव घोरपडे,देवराज पाटील,विक्रम सावंत यांच्यामुळे मला सभापतीची संधी मिळाली आहे. नेत्यांचा विश्वास कामातून सार्थ करून दाखवू. बाजार समितीचे विभाजन करु नये,ही आमची भूमिका आहे. जत,कवठेमहांकाळ येथील उपबाजार समित्या सक्षम करण्यावर भर देणार आहोत.
याप्रसंगी बाजार समितीचे संचालक बबगौंडा पाटील,रमेश पाटील,शशिकांत नागे,काडाप्पा वारद,मारुती बंडगर,सचिव महेश चव्हाण,कसबे डिग्रजचे सरपंच रियाज तांबोळी,स्वप्नील नलवडे, निखिल तेली, विनोद जगदाळे,विक्रम सुर्यवंशी, विजय काशिद,सर्जेराव लकडे,अरुण हजारे, अजित काशिद,प्रदिप सायमोते,वसंत दळवी, नितीन माने,विश्वास सुर्यवंशी,प्रकाश मोहिते,राहूल जाधव,तसेच ग्रामपंचायत सदस्य,विविध संस्थाचे पदाधिकारी उपस्थित होते.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या