दोन प्रौढ नर वाघांची अधिकृत नोंद
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील संवर्धनाला बळ, पर्यटनालाही नवी चालना
कराड/प्रतिनिधी : –
पश्चिम महाराष्ट्रातील जैवविविधतेचा खजिना मानल्या जाणाऱ्या राधानगरी वन्यजीव अभयारण्य मध्ये दोन प्रौढ नर वाघांच्या अस्तित्वाची अधिकृत नोंद झाल्याने वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण घडामोड समोर आली आहे. STR-07 आणि STR-08 अशी नामांकने देण्यात आलेले हे दोन्ही वाघ नर असल्याचे वन विभागाच्या सखोल पडताळणीत स्पष्ट झाले आहे.
वन विभागाकडून नियमित गस्त, कॅमेरा ट्रॅप्स, पगमार्क्स (पावलांचे ठसे) आणि इतर वैज्ञानिक पद्धतींच्या आधारे ही ओळख निश्चित करण्यात आली. या दोन्ही वाघांच्या हालचालींवर सातत्याने लक्ष ठेवले जात असून त्यांच्या क्षेत्रांचा (territory) अभ्यास सध्या सुरू आहे. प्राथमिक निष्कर्षानुसार दोन्ही वाघ प्रौढ अवस्थेतील असून ते स्वतंत्र क्षेत्रांमध्ये वावरत असल्याचे निरीक्षणातून समोर आले आहे.
राधानगरी परिसर हा सह्याद्री व्याघ्र प्रकल्प या महत्त्वपूर्ण व्याघ्र संवर्धन क्षेत्राचा अविभाज्य भाग मानला जातो. सावंतवाडी–दोडामार्ग ते राधानगरी हा पट्टा वाघांच्या नैसर्गिक भ्रमणासाठी (corridor) अत्यंत उपयुक्त असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
या नैसर्गिक मार्गामुळे वाघांना उत्तरे
कडे स्थलांतर करणे सुलभ होते, ज्यामुळे त्यांच्या प्रजातींच्या टिकावासाठी आणि जनुकीय विविधतेसाठी (genetic diversity) मोठी मदत होते. सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वाढणारी वाघांची संख्या ही दीर्घकालीन संवर्धन धोरणांचे यश अधोरेखित करते.
कडे स्थलांतर करणे सुलभ होते, ज्यामुळे त्यांच्या प्रजातींच्या टिकावासाठी आणि जनुकीय विविधतेसाठी (genetic diversity) मोठी मदत होते. सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वाढणारी वाघांची संख्या ही दीर्घकालीन संवर्धन धोरणांचे यश अधोरेखित करते.वनकर्मचाऱ्यांनी कॅमेरा ट्रॅप छायाचित्रे, पगमार्क्स आणि हालचालींचे विश्लेषण यांचा आधार घेत या वाघांची ओळख निश्चित केली आहे. त्यांच्या पाणवठ्यांचा वापर, निवासक्षेत्र आणि हालचालींचे मार्ग यांचा सखोल अभ्यास सुरू असून यामुळे भविष्यातील संवर्धन आराखड्याला दिशा मिळणार आहे.
राधानगरीतील दोन नर वाघांची नोंद ही सह्याद्रीतील वन्यजीव संवर्धनाच्या यशस्वी वाटचालीचे ठळक उदाहरण आहे. वाढती वाघसंख्या, मजबूत वन्यजीव कॉरिडॉर आणि वैज्ञानिक व्यवस्थापन यामुळे हा परिसर भविष्यात देशातील महत्त्वाच्या व्याघ्र अधिवासांपैकी एक म्हणून अधिक भक्कमपणे उदयास येण्याची चिन्हे दिसत आहेत.





