तलाठी व तहसीलदार कार्यालयात एजंट फोफावले
सातारा/प्रतिनिधी-
नुकतीच राज्यशासनाने लाडकी बहीण ही योजना घोषित केली या अंतर्गत लागण्याऱ्या आवश्यक सरकारी दाखले काढताना अशिक्षित महिलांची लूट होत असल्याचे समोर येत आहे
सातारा शहर तलाठी कार्यालयात उत्पन्न आणि रहिवाशी दाखले काढण्यासाठी मंगळवारी दुसऱ्या दिवशी महिलांची प्रचंड झाली, तलाठी कार्यालयात अपुऱ्या जागेत वरांड्यात दोन क्लार्क आणि रांगेत शेकडो महिला, त्यात पाऊसाच्या जोर वाढल्याने महिलांना छत्र्या घेऊन तासन्तास रांगेत थांबावे लागत आहे, सकाळी दहा पासून महिलांनी मोठी गर्दी केली, यात अशिक्षित झोपडपट्टी मधील महिला रेशनकार्ड घेऊन पोहचल्या पण फॉर्म हे तलाठी कार्यालयात मिळत नसून ते समोरच्या पानपट्टीत असल्याचे सांगण्यात येते,एक रुपयांची झेरॉक्स या महिलांना दहा रुपयाला विकले जात आहे तर फॉर्म भरण्यासाठी एका फॉर्म चे वीस रुपये आकारले आज आहे तर हि प्रक्रिया पूर्ण झाल्यावर गर्दीत तासन्तास थांबून तलाटयाची सही त्यासाठी वीस रुपये फि वेगळी
मुसळधार पाऊसात या महिलांचे अक्षरशः हाल होत आहेत ,सरकारनी योजना आणली मात्र त्याच्या अंमलबजावणी साठी सोप्पी व सक्षम उपाययोजना केली नाही , अशी तक्रार या ठिकाणी महिलांनी केली
दाखले देण्यासाठी सरकार ने वेगवेळ्या ठिकाणी सोय करावी, अशी मागणी होत आहे,
पंधरा जुलै पर्यंतच मुदत असल्याने आपण या पासून वंचित राहू नये म्हणून महिला तलाठी कार्यालय ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणीमोठी गर्दी करत आहे आणि याच गर्दीचा फायदा घेऊन काही लोक आपली पोळी भाजून घेत आहेत
ReplyForward
|