३ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त.. मोटार सायकल केल्या हस्तगत
विटा/प्रतिनिधी:-
सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील ( विटा पोलीस ठाणे हद्दीतील) विटा शहरातील कराड रोड ( विवेकानंद नगर) येथून इमारतीच्या पार्किंग मधून होंडा कंपनीचे शाईन मॉडेल चे ही मोटर सायकल कोणी अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याची फिर्याद विटा पोलीस ठाण्यात विटा शहरातील चंदकांत नरसय्या गजेली( सध्या राहणार विटा संभाजीनगर.). यांनी दिली. या फिर्यादीवरून विटा पोलीस ठाण्यात सदर अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.तर दुचाकी चोरीचे प्रमाण वाढते लक्षात घेता सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदिप घुगे व अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोखर मॅडम व विटा उपविभागिय पोलीस अधिकारी विपूल पाटील यांनी विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांना या चोरीचा छडा लावण्याचा आदेश दिला या आदेशानुसार विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांनी विटा पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकास या मोटारसायकल चोरीचा तपास करण्याच्या सुचना दिल्या या अनुषंगाने विटा गुन्हा प्रकटीकरण पथकातील अंमलदार हेमंत गुलाबराव तांबेवाघ यांनी गोपीनाथ माहिती मिळाली की. विटा शहरातील दुचाकी चोरीचा प्रकार हा सातारा येथील अभिषेक मल्लाप्पा हावळेकर या सयशिताने केला आहे आणि तो विटा येथील ग्रामीण रुग्णालय येथे येणार असल्याची माहिती गुन्हे प्रकटीकरण पथकातील तांबेवाघ यांना मिळाल्यानंतर गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदार सह पो.फौ. संभाजी महाडिक. हेमंत तांबेवाघ.महेश संकपाळ. उत्तम माळी .प्रमोद साखरपे. दिग्विजय कराळे. संभाजी सोनवणे. महेश देशमुख. अक्षय जगदाळे. या पथकाने सदर गोपनीय मिळालेल्या माहितीनुसार त्या ठिकाणी सापळा रचून वरिल नावाचा आरोपी ताब्यात घेऊन त्याला या पथकाने त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने सुरवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली.पण पोलीसांनी खाक्या दाखवताच त्याने सदर ही मोटारसायकल मीच चोरली असल्याचे. विटा पोलिसांना सांगितले या वेळी पथकाने आणखी काही गाड्या चोरल्या आहेत का या अनुषंगाने कसून व कौशल्यपूर्ण त्यांच्याकडे तपास केल्यानंतर त्याने पिंपरी चिंचवड व सातारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून काही दुचाकी मोटार सायकल चोरी केल्याची कबूली विटा पोलीस ठाणे पथकातील टीमला दिली .सदर या संयशित चोरट्यांकडून ९ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत जवळपास ३ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही दमदार कामगिरी विटा पोलीस ठाणे कडील गुन्हे प्रकटीकरण पथकाने विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमाणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा गुन्हा उघडकीस आणला.