रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल
कुसडगावचे SRPF प्रशिक्षण केंद्र भाजपच्या काळात बाहेर जाणार होते. पणमहाविकास आघाडी सरकारच्या काळात हे प्रशिक्षण केंद्र पुन्हा जामखेड तालुक्यात आणल्याचे वक्तव्य राष्ट्रावादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केलं. यावेळी आमचे विरोधक (राम शिंदे) बिस्कीट खात बसल्याचा टोलाही रोहित पवारांनी लागवला. आम्ही कधीही सुडाचे राजकारण करत नाही आणि आमच्याबाबत सुडाचे राजकारण कोणी करत असेल तर त्याला सोडतही नाही असेही रोहिकत पवार म्हणाले.
SRPF प्रशिक्षण केंद्रामुळे जामखेड तालुक्यात साडे सहा हजार पोलिस राहणार आहेत. यापुढं राज्यात कुठेही पोलिसांची मदत लागली तर जामखेड तालुक्याला फोन येईल असंही रोहित पवार म्हणाले. इथं काही बॅनर इथे लागले होते, की प्रशिक्षण यांनी (राम शिंदे) यांनी मंजूर केलं, पण माझ्याकडे सर्व जीआर आहेत. तुम्ही अडीच वर्षे मतदारसंघ फिरकले सुद्धा नाहीत. पुढचा आमदार मीच होणार असल्याचा विश्वास रोहित पवारांनी व्यक्त केला.
मी दिल्लीपुढे झुकणार नाही
मी माझ्या मतदारसंघातील लहान बहीण-भावांना चॉकलेट,आणि शालेय साहित्य देतो. मला मन आहे भावना आहे म्हणून मी देतो, पण माझे विरोधक त्यावरूनही टीका करतात. पण तुम्हाला भावना नाही त्याला मी काय करु असेही रोहित पवार म्हणाले. मी कर्जत-जामखेडचा सेवक आहे. कर्जत-जामखेडच्या लोकांना हे लोक घाबरतात असेही ते म्हणाले. SRPF केंद्राबाहेर गेलो तर पोलीस विनंती करत होते हे लोक ऐकणार नाही तुम्हीच त्यांना सांगा. मी ईडी कार्यालयात गेलो तेंव्हा पण कर्जत- जामखेडचे लोक कार्यालयाबाहेर जमा झाले होते. ED कार्यालयात गेलो तर मला पहिला प्रश्न विचारला बाहेर आलेले लोक कुठून आलेत. त्यांना वाटलं तासभर हे लोक थांबतील पण लोक थांबले नाहीत. ED वाले देखील म्हणाले “मान गये बॉस” असे रोहित पवार म्हणाले. ही कर्जत-जामखेडच्या लोकांची ताकद आहे, म्हणून मी दिल्लीपुढे झुकणार नाही. त्यांच्यापुढे हाच प्रश्न असतो की याला थांबवायचे कसे असे रोहित पवार म्हणाले.