प्रचारात आघाडीवर भाजपा तर काँग्रेसची चाल संथगतीनेःकाँग्रेस बाजी पलटणार का?
कराड/प्रतिनिधीः-
महाराष्ट्रातील 288 मतदारसंघांपैकी महत्त्वाचा व कायम चर्चेत असणारा पश्चिम महाराष्ट्रातील मतदार संघ म्हणजेच कराड दक्षिण मतदार संघ या मतदारसंघातील लढतींची चर्चा महाराष्ट्राबरोबरच केंद्रातील चर्चेचा व प्रतिष्ठेचा विषय होत असतो. या विधानसभेच्या निमित्ताने याच कराड दक्षिण मतदार संघात स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या अत्यंत प्रभावशाली व्यक्ती कराड दक्षिण मतदार संघातून राज्य व देशाचे नेतृत्व करताना आपण बघितले आहे.
हा मतदारसंघ काँग्रेस विरोधी शिवसेना ,भाजपा असाच नेहमी लढत आलेला असून सध्याच्या 2024 च्या निवडणुकीमध्ये तिसर्यांदा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विद्यमान आमदार आदरणीय पृथ्वीराज (बाबा) चव्हाण व पारंपारिक प्रतिस्पर्धी भाजपाचे माननीय डॉ. अतुल भोसले (बाबा) यांच्यामध्ये लढत होत असून सध्या हा मतदारसंघ 24 तास राजकीय पटलावर चर्चेचा ठरत असून यात सध्या बाजी मारली आहे ती म्हणजे डॉक्टर अतुल (बाबा) भोसले यांनी अतुल बाबा यांनी आपले आजोबा कै. जयवंतराव भोसले आप्पा यांच्या पावलावर पाऊल ठेवून सहकार, वैद्यकीय, ऊस कारखाना ,शैक्षणिक संस्था .यांचे यशस्वी नेतृत्व करून हजारो युवकांना हक्काची नोकरी मिळवून दिली आहे . कराड दक्षिणचे अगदी डोंगर कपार्यातील शेवटच्या घटकांपर्यंत विकास कामे राजकीय कोणतेही पद नसताना आणून आपले भाजपचे कार्य सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवले आहे. यात महाराष्ट्र शासनाने राबवलेल्या प्रभावीशाही योजना म्हणजेच माझी लाडकी बहीण योजना, आयुष्यमान भारत, शेतकरी सन्मान योजना, बांधकाम कामगार योजना, लाडका भाऊ योजना .या संपूर्ण योजनेचे कॅम्पेन करून सर्वसामान्य घटकांपर्यंत या योजना पोहोचवण्याचं कार्य अतुल बाबा व त्यांच्या कार्यकर्त्यांनी या कालखंडात केले आहे. कराड दक्षिण हा डोंगर कापर्यात वसलेला मतदार संघ आहे या डोंगर कापर्यात छोट्या-मोठ्या वाड्यांवर महायुती सरकारचे कार्य अतुल बाबांच्या माध्यमातून पोहोचलेले आहे .
त्यामुळे अतुल बाबांच्या कार्यकर्त्यांमध्ये फार मोठा उत्साह या निमित्ताने दिसून येत आहे. याच अनुषंगाने दुसर्या बाजूला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कराड दक्षिण मधून सलग दहा वर्षे आमदारकी करत असलेले पृथ्वीराज चव्हाण (बाबा) यांनीही प्रचाराची सुरुवात अतिशय जोरदारपणे केली आहे 2024 मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना मोठ्या प्रमाणावर कराड तालुक्यात निधी बाबांनी आणला असून प्रचंड विकास कामे केली. त्यात प्रामुख्याने कराड तहसील कार्यालय, कराडचे मध्यवर्ती बस स्थानक, कराड तालुक्याला वेगळी ओळख म्हणजेच एम एच 50 आरटीओ कार्यालय, देशातील सर्वात मोठे भूकंप संशोधन केंद्र, शासकीय कृषी महाविद्यालय .तसेच कराड ढेबेवाडी रस्ता, त्याचप्रमाणे कराड मतदार संघातील प्रत्येक गावाला मोठा निधी आपल्या मुख्यमंत्रीपदावर असताना दिलेला आहे. रस्ते ,वीज, पाणी, स्मशानभूमी ,शाळा वैद्यकीय ,क्रीडा या सर्वच विभागात मोठी विकास कामे या कालखंडात झालेली आहेत.
याच विकास कामाच्या जोरावर पृथ्वीराज बाबा सध्या मतदारसंघांमध्ये आपला प्रचार जोरदारपणे करत आहेत हा मतदारसंघ स्वातंत्र्यापासूनच काँग्रेसचा बालेकिल्ला असल्यामुळे पृथ्वीराज बाबा यांचा मतदारांमध्ये मोठा सन्मान आहे. पृथ्वीराज बाबांच्या जोडीलाच करार दक्षिणचे सप्तपदी माजी आमदार कै. विलासराव पाटील उंडाळकर काका यांचे सुपुत्र आदरणीय उदयसिंह पाटील यांची रयत संघटनेची मोठी भक्कम साथ मिळाल्यामुळे पृथ्वीराज चव्हाण साहेबांची कार्यकर्त्यांची फौज मैदानात उतरली असून असंख्य मतदारांपर्यंत ही संघटना काम करत आहे. कराड दक्षिण मधील रयत संघटनेचे आदरणीय उदय दादा पाटील यांनी काकांच्या पावलावर पाऊल ठेवून मतदारांपर्यंत विकास कामे पोहोचवण्यासाठी अहोरात्र काम केले आहे. पृथ्वीराज बाबांना साथ देत असतानाच डोंगर कपार्यातील खेडयापाड्यात राहणार्या लोकांचे नोकरीनिमित्त पुणे, मुंबईमध्ये असणारे असंख्य लोक यांचा मेळावा कराड दक्षिण स्नेह मेळावा पुणे व मुंबई या ठिकाणी घेण्यात आला होता या मेळाव्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे ,शिवराज (दादा) मोरे अशा तरुण तडफदार युवा नेत्यांची साथ मिळत आहे पृथ्वीराज बाबांना मिळत आहे.
महायुतीच्या सरकारच्या कार्यपद्धतीवर म्हणजेच भ्रष्टाचार ,प्रचंड महागाई मुळे सर्वसामान्यांचे मोडलेलं कंबरडं ,कायदा सुव्यवस्था अशा असंख्य मुद्द्यांवर सध्या पृथ्वीराज बाबा यांनी प्रचारात बाजू मांडली आहे . आरोप प्रत्यारोप यांच्या फैरी री दोन्ही बाजूंकडून मोठ्या प्रमाणात सुरू आहेत.. आता उत्सुकता लागली आहे की या मतदारसंघात कोण बाजी मारणार. कराड दक्षिण ला एक नवीन आमदार मिळणार की महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण(बाबा) यापुढेही या मतदारसंघावर आपली पकड ठेवणार हेच यापुढील कालखंडात मतदार राजा ठरवणार आहे .