कराडच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील घटना
उंब्रज/प्रतिनिधीः-
सदरची घटना उंब्रज ता.कराड येथील खुल्या गटातील एका सर्वसामान्य कुटुंबातील मुलीच्या बाबतीत घडली असून कराड येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेण्याचे स्वप्न यामुळे भंगले आहे संबधित मुलीच्या पालकांना ही धक्कादायक घटना वर्णन करीत असताना वारंवार मन भरून येत होते.जाणीवपूर्वक आम्ही याबाबत विद्यार्थी मुलीच्या पालकांचे अथवा मुलीचे नाव जाहीर करत नाही कारण शैक्षणिक आयुष्यात तिला अजून बराच लांबचा पल्ला गाठायचा असल्याने काही संकेत पाळत आहोत.
मुलीच्या पालकांनी सांगितलेल्या घटनेनुसार स्पॉट राउंडला मुलीचे आई वडील हजर असून फक्त विद्यार्थी मुलीला कोल्हापूर येथुल कराडला यायला थोडा वेळ लागणार असल्याने हुकमी मिळणारा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा प्रवेश नाकारला होता.मुलीला इयत्ता बारावी परीक्षे नंतर 88.69% गुण सीईटी परीक्षेत मिळाले आहेत.अथक प्रयत्न करून शासकीय कॉलेजला प्रवेश न मिळाल्याने सध्या ती कोल्हापूरला डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये शिकत असून तिने कराड शासकीय अभियांत्रिकी कॉलेजला पहिल्या दोन्ही राऊंडला प्रयत्न केले होते परंतु तिच्या दुर्दैवाने प्रवेश यादी मेरिट पर्यंत यायची आणि राऊंड संपायचा यामुळे पालकांनी तिला नाईलाजाने कोल्हापूरला ऍडमिशन घेतलं होत.
दरम्यान काही जागा शिल्लक राहिल्याने शासनाने राज्यातील गव्हर्नमेंट कॉलेजचे स्पॉट राऊंड चालू केले होते आणि 23 ऑक्टोबरला कराड शासकीय कॉलेजचा स्पॉट राउंड होता त्यात तिचा फॉर्म पालकांनी भरला होता आणि सुदैवाने तिचं नाव मेरिटलिस्ट मध्ये आलं होतं परंतु नशिबाने दिल आणि कॉलेजने पळविल अशी गत होऊन विद्यार्थी मुलगी हजर नसल्यामुळे ते ऍडमिशन दिलं नाही पालकांनी विनंती केली पण कॉलेज प्रशासनाची भाषा फार गुर्मीची असल्याची तक्रार पालकांची होती दहा मिनिटे पण वाट नाही बघितली त्यांनी लगेच पुढच्या विद्यार्थ्यांचे नाव घोषित करून त्याला ऍडमिशन दिल कारण विद्यार्थी मुलगी कोल्हापूर येथून गाडीत बसून कराडला यायला निघाली होती राऊंड तीन वाजेपर्यंत संपणार होता पालक एक वाजता गेले होते लगेच तिचं नाव यादीत आलं आणि पालकांनी त्यांना सांगितलं की एक तासभर लागेल ती येईल ऑन द वे आहे ती तरी पण कॉलेज प्रशासन ऐकायला तयार नाही असा प्रकार घडला होता मुळातच शासन नियमानुसार कोणतीही नियमावली कराड शासकीय कॉलेजने पाळली नसल्याची तक्रार पालकांची आहे.
म्हणजे एकतर ऍडमिशन मेरीट वर मिळत असताना पालक हजर असून कॉलेज प्रशासनामुळे तिला हक्काचं आणि नशिबात असणारे ऍडमिशन मिळून दिले नाही कॉलेज प्रशासनाला वाटले की हे पालक म्हणजे कोणीतरी आपल्याकडे भिक्षा मागायला लागले आहेत अशीच भावना पालकांनी व्यक्त केली परंतु मागील दोन राउंडला पालक दिवसभर उपाशीपोटी बसले होते कॉलेज प्रशासन मात्र वडापाववर ताव मारीत आपले कामकाज करीत वाटेल तेव्हा ब्रेक घेत होते. आम्ही बरेच पालक दिवस दिवस थांबून होतो पण स्पॉट राउंडला मुलीचे नाव यादीत आल्यावर कॉलेज प्रशासन तासभर थांबत नसल्याने या गोष्टीच खूप वाईट वाटलं मुलांनी रात्रंदिवस अभ्यास करून मार्क पाडून त्यांची पात्रता असतानाही घरापासून विनाकारण लांब ऍडमिशन घ्यावे लागते अशी भावना पालकांनी व्यक्त केली.
परंतु कॉलेज प्रशासनातील काही नतद्रष्ट लोकांमुळे आम्हाला मुलीला शिक्षणासाठी बाहेर ठेवण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे अशी पालकांची तक्रार असून मुलीला कराडला प्रवेश मिळावा यासाठी धडपडत होतो. कारण एकतर ती हुशार होती आणि नशिबाने तिचे नाव स्पॉट राउंडच्या यादीत आले होते यासाठी पालकांनी कॉलेज प्रशासनाच्या विनवण्या केल्या कारण आपली मुलगी कराडमध्ये सुरक्षित आणि आपल्या घरात राहावी आणि तिला ऍडमिशन बाकीच्या सगळ्याच कॉलेजमध्ये भेटत होते परंतु तिचाच हट्ट होता की मला गव्हर्मेंट कॉलेज पाहिजे आणि ती संधी निर्माण झाली होती परंतु दुर्दैव दुसरे काय पण पालकांनी संबंधित कॉलेज प्रशासनाला सनदशीर मार्गाने धडा शिकवण्यासाठी विडा उचलला असून न्याय मिळेपर्यंत लढणार असल्याची खूणगाठ मनाशी पक्की केली आहे.
अन्यायग्रस्त पालक
मी कोल्हापूर वरून कराडला यायला स्पेशल गाडी करून निघाले होते परंतु थोडं अंतर पुढं आल्यावर मम्मी आणि पप्पांचा फोन आला तू येऊ नको कॉलेजने तू हजर नसल्याने सदरचे ऍडमिशन दुसर्या कोणाला तरी दिले यामुळे सदर खाजगी गाडी चालकाला भाड्यापोटी तीनशे रुपये दिले आणि अतिशय दुःखी अंतःकरणाने अर्ध्या रस्त्यातुन परत कोल्हापूरला माघारी फिरले हाता तोंडाशी आलेला घास गेल्याने मनाला खूप वेदना झाल्या आणि शासकीय महाविद्यालयात शिकण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले.