कराड/प्रतिनिधी:-
विद्येचे माहेरघर अशी ओळख कराड तालुक्याची संपूर्ण महाराष्ट्रभर आहे.याच विद्येच्या माहेर घरात असलेल्या कराड पंचायत समितीच्या शिक्षण विभागात दिल्या घेतल्याची चर्चा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.शिक्षण विभागाच्या सर्वोच्च अधिकार्याने शाळांना भेटी देऊन शालेय पोषण आहार तपासणी केली. तोडपाण्यासाठी मुख्याध्यापकांना पंचायत समितीत बोलावूनहात ओले करून घेतल्याचा बोलबाला आहे.
कराड तालुका हा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची कर्मभूमी म्हणून महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे.त्याचबरोबर विद्येचे माहेरघर अशी या तालुक्याची ओळख आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने असलेल्या कराड पंचायत समिती मधील शिक्षण विभागात मात्र तोडपाणी मोठ्या प्रमाणात सुरू आहे.गटशिक्षणाधिकारी आणि शिक्षण विस्तार अधिकारी मोठ्या प्रमाणात शाळा भेट करून शालेय पोषण आहाराची तपासणी करीत आहेत.यामध्ये नेहमीच शिक्षकांना अडचणीचा सामना करावा लागतो.
शालेय पोषण आहार रेकॉर्डमध्ये चूक ही सापडतेच. हीच चूक दाखवून शेरे पुस्तक स्वतः सोबत घेऊन शाळेच्या मुख्याध्यापकांना पंचायत समितीमध्ये बोलवून घेतले जात आहे. येथे कारवाईचा बडगा दाखवून त्यांच्याकडून वसुली केली जात आहे आणि तोडपाणी करून हे प्रकरण मिटवले जात आहे.यशवंतराव चव्हाण यांची कर्मभूमी असलेल्या पंचायत समितीमध्ये असा प्रकार होत असल्याने या प्रकाराबाबत नापसंती व्यक्त केली जात आहे.
अधिकार्यांनी यामध्ये लक्ष घालून या प्रकाराचा छडा लावला पाहिजे. मुख्यमंत्री स्वच्छ सुंदर शाळा प्रथम क्रमांक देताना तोड पाणी केल्याची ही चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहे.हा आकडा तर काही हजारांमध्ये आहे.अतिशय लाजिरवाणा प्रकार शिक्षण विभागात सुरू असून पवारांचा सल्ला या नूतन अधिकार्याला अडचणीचा ठरणार असेच सर्वत्र बोलले जात आहे.
काही शाळांना शोकास नोटीस
कराड तालुक्यातील काही शाळांमध्ये तपासणी करण्यात आली आहे, त्यातील तीन शाळांच्या पोषन आहारामध्ये तफ ावत आढळली असून त्या शाळांना शोकास नोटीस दिल्या आहेत. त्याचा अद्याप खुलासा आलेला नाही. पाषन आहारासंदर्भात स्वतंत्र अधिकारी काम करतात.
-बिपीन मोरे,
गटशिक्षणाधिकारी,कराड प.स.
शाळा भेटी दर्जा सुधारण्यासाठी की तोड पाण्यासाठी
अधिकार्यांनी शाळा भेटी देऊन शिक्षणाचा दर्जा सुधारणे साठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.चुकांबाबत मार्गदर्शन करणे,आदर्श अध्यापन म्हणजे काय हे शिकवणे, याचबरोबर त्रुटी शोधून त्याचा निपटारा करणे.हा भेटीमागे उद्देश असतो.सध्या होत असलेल्या भेटी या चुका शोधून हात ओले करून घेण्यासाठी आहेत असेच दिसून येत आहे.