शालेय पोषण आहाराचे जुळवाजुळव करण्यात..
कराड/प्रतिनिधीः-
कराड पंचायत समितीच्या शिक्षण विभागात सुरू असलेल्या शालेय पोषण आहारामध्ये तफ ावत असल्याचे काही शाळांच्या निदर्शनास आल्यानंतर शाळेच्या प्रशासनाने जुळवाजुळव करण्यात आजचा दिवस घालवला. शाळेमार्फ त देण्यात येणारा शालेय पोषण आहार तपासणी करणारे कोण? आणि त्यांच्यावर कारवाई करणारे कोण? या चर्चेतच पंचायत समितीच्या शालेय समितीने दिवस ढकलला. दोषी कोण आहे आणि त्यांच्यावर कारवाई करणार कोण हे मात्र गुलदस्त्यात ठेवत आलेल्या बातमीचा शोध घेण्यातच वरिष्ठ गुंतल्याचे दिसून आले.
आज प्रीतिसंगमने ‘कराड पंचायत समितीच्या शिक्षण विभागात दिल्या घेतल्याची चर्चा’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले आणि शिक्षण विभागात गोंधळ उडाला. वरिष्ठ अधिकारी धावपळ करू लागले, बातमीमागचा सूत्रधार कोण हे शोधण्याच्या नादात शाळेत घडत असलेल्या प्रकाराकडे दुर्लक्ष करत जणू काही आम्ही त्यातले नाही. अशा थाटात वावरताना दिसत होते. शासनाने सुरू केलेला शालेय पोषण आहार आणि त्याचे निकष ठरवून दिले आहेत. त्याचे पालन मात्र, तालुक्यात कोठेही होताना दिसून येत नाही. यावरती नियंत्रण ठेवण्याकरीता पोषण आहार समित्या गठित करण्यात आल्या आहेत. मात्र, त्यांचेही कामकाज संशयाच्या भोवर्यातच आहे.
शालेय पोषण आहार वितरीत करण्याचे रेकॉर्ड प्रत्येक शाळेने ठेवणे बंधनकारक आहे. याकरीता शेरे पुस्तक आणि त्याच्या नोंदी या जुळल्या गेल्या पाहिजेत, प्रत्यक्षात मात्र यामध्ये तफ ावत आढळते. याच गोष्टीवर वरिष्ठ अधिकारी बोट ठेवून व नोंद वही आणि कारवाईचा बडगा दाखवत माला-माल होण्याचा प्रयत्न करतात. तालुक्याच्या अधिकार्यांच्याकडून सातत्याने शाळेतील मुख्याध्यापकासह इतर कर्मचार्यांच्यावर दडपण असते. अशा परिस्थितीत शालेय पोषण आहाराची तपासणी काटेकोरपणे होणे गरजेचे आहे. शासनाने दिलेले धान्य परस्पर विल्हेवाट केले जाते की काय? याचाही शोध घेणे गरजेचे आहे. शाळा कोणती आहे, हे न पाहता त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे. शासकीय योजनांची अंमलबजावणी होवून प्रत्येक विद्यार्थ्याला याचा लाभ मिळाला पाहिजे, हे पाहण्याचे काम कोणाचे.
आज दिवसभर प्रत्येक शाळेमध्ये आपणाकडे आलेले धान्य आणि प्रत्यक्षात वापरलेले धान्य याची तफ ावत आहे की काय? याचा शोध घेवून, जुळवाजुळव करण्यात तालुक्यातील सर्वच शाळांचे शिक्षक गुंतल्याचे पहायला मिळाले. शाळांमधून वितरीत होणारे हे साहित्य आणि त्यांच्याकडे असलेले शेरे पुस्तक एकसारखे व्हावे याकरीता दिवसभर लगबग सुरू होती. यथा अवकाश याचा पोलखोल आम्ही सविस्तर करूच.