16.4 C
New York
Tuesday, March 11, 2025

Buy now

spot_img
spot_img

भागप्पा हरिजन याचा त्याच्याच टोळीतील जवळच्या माणसांनी केला गेम 

35 वर्षाच्या साम्राज्याला पिंट्या ने लावला सुरुंग;भागप्पाने जे पेरले ते उगवले

महेश गायकवाड/सोलापूर –

संपूर्ण कर्नाटक राज्यात आणि महाराष्ट्र राज्यातील सोलापूर धाराशिव लातूर सांगली कोल्हापूर रत्नागिरी या जिल्ह्यात आपले दहशतीचे साम्राज्य निर्माण करूनआपल्या गुन्हेगारीचा दबदबा ठेवलेला भागप्पा हरिजन याच्या साम्राज्याला त्याच्याच टोळीतील जवळच्या पिंट्या ने सुरुंग लावला आणि भागप्पा चे 35 वर्षाचे साम्राज्य धुळीस मिळविले.

काल मंगळवार दिनांक 11 फेब्रुवारी 25 रोजी विजापूर शहरात सायंकाळी साडे सात वाजता भागप्पा हरिजन (वय 58 वर्षे ) याच्यावर त्यांच्याच टोळीतील जवळच्या माणसांनी एकुण सहा गोळ्या भागप्पा याच्यावर झाडून हत्या केली आहेत.

दरम्यान आज हजारो आंबेडकरी अनुयायी आणि हजारो भागप्पा प्रेमी लोकांच्या उपस्थितीत सायंकाळी साडे चार वाजता अफजलपूर तालुक्यातील माडग्याळ येथे भागप्पा हरिजन याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. भागप्पा याच्या मृत्यूमुळे भागपा हरिजन टोळी संपल्यात जमा आहे. कारण या टोळीत भागप्पा चे अत्यंत जवळचे कुणी नातेवाईक सहभागी नव्हते .परंतू ,25 वर्षापूर्वी याच भागप्पा हरिजन यांने फितूर होऊनटीप दिल्यामुळे चंदया ऊर्फ चंदपा हरिजन याचा दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथे पोलिसांना एनकाउंटर करुन गेम केला होता.

35.वर्षापूर्वी भागप्पा याने जे पेरले होते ते 35वर्षानंतर उगवले अशी कुचवूज आणि चर्चा कलबुर्गी विजापूर सोलापूर सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेत ऐकायला मिळाली .

भागप्पा हरिजन याला चंदया हरिजन टोळी कडून धोका होता हा धोका लक्षात घेऊन भागप्पा हरिजन याने आपली दुश्मनी मोठ्या प्रमाणावर कमी केली होती परंतू भागपा चे वाढते साम्राज्य त्याच्याच टोळीतील काही जणांना खुपसत होते याच साम्राज्यातून भागप्पा चा काटा काढण्यात असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. भागप्पा याने आपले मोठ्या प्रमाणावर साम्राज्य निर्माण केले होते या साम्राज्या मुळे भागप्पा हा सीमावर्ती महाराष्ट्र भागातील अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यात संपर्क ठेवून होता अशी माहिती कळते.

भागप्पा च्या वकिल असलेल्या पत्नी संगीता तळवार हिला ही इंडी तालुक्यात तिच्या कार वर मालट्रक घालून खून करण्यात आला होता तर यापूर्वी भागप्पा याच्यावर दोन वेळा जीवघेणे हल्ले कलबुर्गी येथे आणि विजापूर कोर्टाच्या आवारात करण्यात आले होते परंतू या दोन्ही हल्ल्यांमधून भागप्पा सहिसलामत वाचला होता परंतू 25 वर्षापूर्वी जी गेम भागप्पा याने चंदया हरिजन याच्या बाबतीत खेळली होती तीच गेम 35 वर्षाच्या नंतर त्याच्या च अंगावर त्याच्याच टोळीतील लोकांनी उलटवली आणि भागप्पा हरिजन याच्या 35 वर्षाच्या साम्राज्याला सुरुंग लावून बदला घेतला आहे

जरी भागप्पा हरिजन याचा त्याच्याच टोळीतील जवळच्या माणसांनी गेम केला असला तरी यातून विजापूर क्लबुर्गी जिल्ह्यात तसेच सीमावर्ती महाराष्ट्र भागात टोळी युद्ध भडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

गुन्हेगाराचा गुन्हेगारांनीच खून केला आहे 35 वर्षापूर्वी हाच भागप्पा हा सतरा किंवा अठरा वर्षाचा असेल त्यावेळी त्याचा गुरु चंदया हरिजन याच्या टोळीतील प्रमुख होता चंदया हरिजन याच्या एनकाउंटर नंतर चंदया हरिजन टोळी चे सूत्रे भागप्पा याने स्वतःकडे घेतली होती आणि 35 वर्षात आपले स्वतःचे मोठे साम्राज्य कर्नाटक राज्यात आणि सीमावर्ती महाराष्ट्र भागातील सांगली कोल्हापूर जिल्ह्यात सोलापूर धाराशिव निर्माण केले होते.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या