spot_img
spot_img
spot_img
spot_img

कराड पालिकेत नगराध्यक्षपदासाठी खुले आरक्षण 

इच्छुकांच्या समर्थकांनी फोडले फटाके; राजकीय मोर्चेबांधणीस सुरुवात, नागरिकांमध्ये उत्सुकता  
कराड/प्रतिनिधी : –
राज्यभरात प्रलंबित नगरपालिका निवडणुका जाहीर झाल्या असून, आज नगराध्यक्ष पदासाठीची आरक्षण सोडत झाली. यामध्ये कराड नगरपालिकेसाठी अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर खुल्या प्रवर्गाचे आरक्षण पडले आहे. यामुळे नगराध्यक्षपदासाठी खुल्या प्रवर्गातील इच्छुकांच्या समर्थकांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला. खुल्या प्रवर्गातून इच्छुकांची भाऊगर्दी असल्याने पक्ष आणि स्थानिक आघाड्यांमधून नेमकी कोणती नावे पुढे येतात, याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता लागून राहिली आहे.
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना न्यायालयाने स्थगिती दिली होती. दरम्यान, याबाबत न्यायालयाच्या निकालानंतर नगरपालिकांच्या प्रभाग रचना, त्यावरील हरकती मागवण्यात आल्या. तर आज सोमवारी नगराध्यक्ष पदासाठीचे आरक्षण जाहीर करण्यात आले. यामध्ये कराड नगरपालिकेत अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर खुल्या प्रवर्गाचे आरक्षण पडले आहे. त्यामुळे या प्रवर्गातील इच्छुक उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी आनंद व्यक्त केला. तसेच शहरातील काही भागात त्यांच्या समर्थकांनी फटाके फोडून आनंदही व्यक्त केला.
कराड नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी खुल्या प्रवर्गातून माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव हे दावेदार मानले जात आहेत. नगराध्यक्ष पदासाठी खुल्या प्रवर्गाचे आरक्षण पडल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी फटाके फोडून आपला आनंद व्यक्त केला आहे. नुकत्याच झालेल्या त्यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील अनेक ठिकाणी भावी नगराध्यक्ष, शहर कुटुंबप्रमुख अशा आशयाचे शुभेच्छा फलक लागले होते. त्यामुळे नगराध्यक्ष पदासाठी खुल्या प्रवर्गातील आरक्षण पडण्याआधीच त्यांनी व त्यांच्या समर्थकांनी नगराध्यक्षपदावर आपली दावेदारी सांगितली होती.
तर दुसरीकडे माजी उपनगराध्यक्ष जयवंतराव पाटील हेही नगराध्यक्ष पदाचे दावेदार आहेत. त्यांना मानणार मोठा गट असून, त्यांची कराड दक्षिणचे विद्यमान आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्याशी वाढती सलगी पाहता नगरपालिकेसाठी नेमके काय समीकरण समोर येणार आहे, याची नागरिकांना उत्सुकता लागून राहिली आहे.
तसेच भारतीय जनता पार्टीकडून अद्याप नगराध्यक्ष पदासाठी कोणाचेही नाव पुढे आलेले नाही. मात्र ज्येष्ठ नेते विनायक पावसकर यांच्या नुकत्याच झालेल्या वाढदिवसानिमित्त नागरिकांसाठी विविध योजनांची घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे खुल्या प्रवर्गातून नगराध्यक्ष पदासाठी विनायक पावसकर यांचे नाव पुढे आल्यास, आश्चर्य वाटणार नाही.
त्याचबरोबर काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडूनही अद्याप नगराध्यक्ष पदासाठी कोणाच्याही नावाची चर्चा सुरू असल्याचे प्रकर्षाने समोर आलेले नाही. मात्र, राष्ट्रवादीकडे अभ्यासून नेतृत्व, माजी नगरसेवक सौरभ पाटील यांचेही नाव ऐनवेळी पुढे येण्याची शक्यता आहे. दरम्यान, या दोन्ही पक्षांची रणनीती नेमकी काय असेल, नगराध्यक्ष पदासाठीचा चेहरा कोण असेल, याबाबतही नागरिक, कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता लागून राहिली आहे.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या