spot_img
spot_img
spot_img
spot_img

कोल्हापूर रस्त्यावरील अतिक्रमणांवर हातोडा

महापालिकेची मोहिम:खोकीधारकांचा विरोध डावलून मोहिम

सांगली/प्रतिनिधी:-
शास्त्री चौक ते शंभर फुटी पर्यंतच्या रस्ता रुंदिकरणासाठी अडथळा ठरणारी अतिक्रमणे काढण्याची मोहिम महापालिकेने सुरु केली. येथील भारतभीम ज्योतीरामदादा कुस्ती आखाड्याच्या समोरील अतिक्रमणांवर जेबीसी चालवत दहा अतिक्रमणांवर पालिकेने हातोडा टाकला. खोकीधारकानी विरोध केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. मात्र पालिका कारवाईवर ठाम राहिली. विरोध डावलून मोहिम राबण्यात आली. शनिवारीही ही मोहिम राबवण्यात आली.
कोल्हापूर रस्त्यावरील आकाशवाणी केंद्राजवळ बसच्या धडकेत महिलेचा बळी गेल्यानंतर रुंदीकरणाचा प्रश्न ऐरणीवर आला. सर्वपक्षीय कृती समितीसह विविध संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याची पाहणी केली. पावसाळा असल्याने तात्पुरती मलमपट्टीही करण्यात आली. त्यानंतर अपघात झाल्याने तातडीने रुदीकरणाचे काम सुरू करण्याची आग्रही भूमिका नागरीकांनी घेतली. त्यानंतर अतिक्रमण आणि जलवाहिनी स्थलांतरणासाठी बांधकाम विभागाने महापालिकेशी पत्रव्यवहार केला. त्यानंतर आयुक्त सत्यम गांधी यांनी तातडीने अतिक्रमण हटवण्याचे आदेश दिले. त्यानंतर उपायुक्तांनी खोकीधारकांना अतिक्रमणे काढून घेण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या होता. तरीही अतिक्रमणे हटवण्यात आली नसल्याने महापालिकेचे पथक दाखल झाले. भारतभीम ज्योतीरामदादा कुस्ती आखाड्याच्या समोरील अतिक्रमणे जेसीबीच्या सहाय्याने जमिनदोस्त करण्यात आली.
यावेळी उपायुक्त स्मृती पाटील यांच्यासह पथक दाखल होते. रस्याचे 35 मीटर रुंदीने रेखांकनाचे काम पुर्ण झाले आहे. या रुंदिकरणात खोकी, हॉटेलचे पार्किंगसह अनेक अतिक्रमणे आहेत. ही सर्व अतिक्रमणे काढण्यात येणार असल्याचे उपायुक्त स्मृती पाटील यांनी सांगीतले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या