गजानन हौसिंग सोसायटी ते एमएसईबी रस्त्याची दुरावस्था
कराड/प्रतिनिधी –
गोवारे (ता.कराड) येथील गजानन हौसिंग सोसायटी ते एमएसईबी रस्त्यात मोठयाप्रमाणात खड्डे पडल्याने रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे. त्यामुळे येथील रहिवाशांना मरणयातना सहन कराव्या लागत आहेत. या रस्त्याच्या कामासाठी सुमारे साडेचार कोटी रूपयांचा निधी मंजूर झाल्याचे वेळोवेळी सांगण्यात येत आहे. प्रत्यक्षात मात्र रस्त्याची साधी डागडुजीसुद्धा होत नसल्याने संतापलेल्या रहिवाशांनी खड्डयातील पाण्यात बसून आंदोलन केले.
गोवारे येथील गजानन हौसिंग सोसायटीतून एमएसईबी, विरवडे ते करवडी असा औंध कालीन रस्ता आहे. दरम्यान गजानन हौसिंग सोसायटी ते एमएसईबी या गोवारे, सैदापूर, हजारमाची व विरवडे या चार ग्रामपंचायत हद्दीतील आंदाजे दोन किमीच्या रस्त्याची जवळपास दहा वर्षांपासून दुरावस्था झाली आहे. रस्त्यात मोठयाप्रमाणात खड्डे पडले असून संपुर्ण रस्ता उखडला आहे. रस्त्याच्या कडेला असले असलेल्या नाला पुर्ण मुजला असून गटारीचे पाणी रस्त्यातून वहात आहे. रस्त्याच्या दुतर्फा मोठयाप्रमाणात झाडी वाढल्याने रस्ता आरूंद झाला आहे. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अपघात होऊन अनेक नागरीक जयबंदी झाले आहेत.
वहातूकीवच्या दृष्टीने अत्यंत महात्वाचा रस्ता असतानाही बांधकाम विभागाने रस्त्याच्या देखभाल दुरूस्तीकडे दुर्लक्ष केले आहे. तर लोकप्रतिनीधींचीही चुप्पी आहे. त्यामुळे येथील रहिवाशांना मरणयातना सहन कराव्या लागत आहेत. याबाबत रहिवाशांनी अनेकदा निवेदने दिली मात्र रस्त्याची दुरूस्ती झाली नाही. या रस्त्याच्या कामासाठी सुमारे साडेचार कोटी रूपयांचा निधी मंजूर झाल्याचे सांगण्यात येत आहे. तरीही रस्त्याचे काम का होत नाही असा सवाल उपस्थीत होत आहे.
याबाबत . तसेच खड्डयात बसून आंदोलन करण्यात आले. प्रशासनाने या आंदोलनाची दखल घेऊन तत्काळ रस्त्याची दुरूस्ती करावी अन्यथा जिल्हा परीषद व जबाबदार अधिकाऱ्यांच्या कार्यालयात खड्डयातील पाणी टाकण्याचा ईशारा देण्यात आला आहे यावेळीमहिला व नागरीक उपस्थीत होते.