8.6 C
New York
Thursday, November 21, 2024

Buy now

spot_img
spot_img

राहुल गांधी यांच्या सभेची जय्यत तयारी, कडेगावात २० एकरात भव्य मंडप

कडेगाव :

राज्याचे ज्येष्ठ नेते पलूस-कडेगावसह सांगली जिल्ह्याचे भाग्यविधाते स्व.डॉ.पतंगराव कदम यांचा सोनहिरा साखर कारखाना कार्यस्थळावरील ‘लोकतीर्थ’ स्मारक व पूर्णाकृती पुतळा यांचा लोकार्पण सोहळा तसेच कडेगांव येथील मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम कन्या महाविद्यालय येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले ग्रंथालय असे नामकरण व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर क्रीडागृह नामकरण आणि खासदार राहुल गांधी यांची जाहीर सभा अशा भव्य कार्यक्रमाचे आयोजन (गुरुवार) दि. 5 सप्टेंबर रोजी होणार आहे. या निमित्त जय्यत तयारी सुरू असून, कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.

या कार्यक्रमा निमित्त पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक मोठे अत्याधुनिक पद्धतीचे सभामंडप कडेगांव येथील मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम महाविद्यालयाच्या प्रारंगणात तब्बल वीस एकर क्षेत्रात उभारण्यात आले आहे. यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. यामध्ये दीड लाख लोकांची खुर्चीवर बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

लोकतीर्थ स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्याच्या या ठिकाणी थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. या ठिकाणी येण्यासाठी एक व्ही.व्ही.आय.पी, एक व्ही.आय.पी. तसेच तीन कॉमन प्रवेशद्वार ठेवण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिका पलूस-कडेगावच्या घराघरात व सांगली जिल्ह्यात पोहोच करण्यात आल्या आहेत.

कडेगांव, पलूस तालुक्यासह जिल्ह्यातील व राज्यातील हजारो कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम 5 सप्टेंबर म्हणजे ‘शिक्षक दिनी’ होत असल्याने त्यास विशेष असे महत्त्व आहे. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी कदम कुटुंबीय तसेच पलूस-कडेगावसह सांगली जिल्ह्यातील कार्यकर्ते व सबंध राज्यभरातील डॉ. पतंगराव कदम यांच्यावर प्रेम करणारी मंडळी अहोरात्र कष्ट घेत आहेत.

दिग्गजांची राहणार उपस्थिती

या कार्यक्रमास अखिल भारतीय काँग्रेसचे नेते व लोकसभेचे विरोधी पक्षनेते खा.राहुल गांधी, काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मलिक्कार्जुन खरगे, देशाचे माजी कृषीमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस खा.सी.वेणुगोपाल, खा.मुकुल वासनिक, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आ.बाळासाहेब थोरात, आ.सतेज पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यांच्यासह राज्यातील काँग्रेसचे व मित्र पक्षांचे आमदार, खासदार, काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते, राज्यातील पक्षाचे नेते, पदाधिकारी यांच्यासह लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थित व प्रचंड अशा जनसागराच्या साक्षीने संपन्न होणार आहे.

धुनिक टेक्नॉलॉजीचा वापर

कडेगाव येथील मातोश्री बयाबाई कदम महाविद्यालयाच्या प्रांगणात सभेचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी राज्यातील हजारो लोक उपस्थितीत राहणार आहेत. त्या दृष्टीने राज्याचे माजी मंत्री आ.डॉ.विश्वजीत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाची जोरदार व जय्यत तयारी सुरू आहे. त्यासाठी या ठिकाणी 20 एकर जागेत सुमारे पाच लाख स्क्वेअर फूट जागेत जर्मन हंगर मंडप उभारण्यात आला आहे. यामध्ये 40 बाय 250 मीटरचे जर्मन हंगर मंडपचे चार शेड तसेच 10 बायचे 250 मीटरचे दोन शेड उभे करण्यात आले आहेत. या मंडपामध्ये 80 बाय 40 फुटांचे व्यासपीठ असणार आहे. यामध्ये त्याच्या बाजूला 30 फूट बाय 20 फूटाचे स्टेज आहे. माध्यमांच्यासाठी डी सर्कल या सुरक्षा कडाच्या बाजूस जागा असेल. तसेच व्यासपीठाच्या 60 फूट अंतरापासून संपूर्ण मंडपात 12 फूट बाय 8 फूटाच्या सुमारे 32 स्क्रीन लावण्यात आल्या आहेत. तसेच समोर 32 फूट बाय 14 फूटाच्या दोन स्क्रीन, 16 फूट बाय 40 फूटाच्या दोन कर्व्ह स्क्रीन बसविण्यात आली आहे. की जेणेकरून मंडपात बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला योग्य पध्दतीने कार्यक्रम पाहता येईल. तर शहर परिसरात 14 विविध ठिकाणी सभेसाठी येणाऱ्या वाहनांची पार्किंगची सोय करण्यात आली आहे.

 

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या