आमदार शशिकांत शिंदे यांचा कोरेगाव पोलिसांवर आरोप,
सातारा/प्रतिनिधी
कोरेगावचे विद्यमान आमदार यांच्या राजकीय दबाव पुढे लोटांगण घालून तेथील पोलीस त्यांचे कार्यकर्ते असल्याप्रमाणे काम करत आहेत . माझ्या कार्यकर्त्यांना अमिषे दाखवली जात आहेत, वेगवेगळ्या ऑफर दिल्या जात आहेत, विरोधकांची कुंडली काढून खोट्या तक्रारी दाखल केल्या जात आहेत असा घणाघाती आरोप विधान परिषदेचे आमदार राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांशी झालेल्या बैठकीनंतर शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला .ते म्हणाले कोरेगाव मतदार संघात पोलीस व प्रशासनाचा वापर करून दबाव दाखवला जात आहे .राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे पक्षप्रवेश घेतले जात आहेत, कोरेगाव मतदार संघातील पोलीस व प्रशासन विद्यमान आमदारांचे कार्यकर्ते म्हणून काम करत आहेत . गणेशोत्सवानंतर रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचा इशारा शशिकांत शिंदे यांनी दिला. आगामी निवडणुका जिंकण्यासाठी सत्ताधारी पोलीस प्रशासनाचा गैरवापर करत असून हे सूत्र केंद्रातून राज्यात आले आहे अशी टीका त्यांनी केली .
कोरेगाव विधानसभा मतदारसंघात जे दबावाचे राजकारण सुरू आहे त्याची स्पष्ट कल्पना जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी व पोलीस अधीक्षक समीर शेख यांना आमदार शशिकांत शिंदे यांनी दिली आहे . ते पुढे म्हणाले मतदारसंघातील पोलीस व प्रशासन आमदारांचे कार्यकर्ते असल्याप्रमाणे काम करत आहेत .हा प्रकार पोलीस व प्रशासनाच्या कानावर घातला आहे मात्र त्यांच्याकडून दुर्लक्ष होत आहे या मतदारसंघातील पोलीस व प्रशासन कोणत्या दबावात खाली काम करते हे ठाऊक आहे . तुम्ही आमच्याकडे आला नाही तर कारवाई करू तसेच इतर आमिषे दाखवली जात आहेत वेगवेगळ्या ऑफर दिल्या जात आहेत नियम सर्वांना सारखा लावला जावा विनाकारण विरोधकांची कुंडली काढून खोट्या तक्रारी दाखल केल्या जात आहेत याची दखल पोलीस घेत नाहीत . टार्गेट करून कारवाई केली जात आहे दबाव टाकून प्रसंगी गुन्हे दाखल करण्याची धमकी देत कोरेगावचे आमदार पक्ष प्रवेश घेत आहेत . पोलिसांनी तर एकाच गावातील आमच्या दोन कार्यकर्त्यांबाबत असा प्रकार केला असून पोलीस कार्यकर्त्यांच्या भूमिकेत वावरत असेल तर आम्हाला पोलिसांच्या विरोधात रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा शिंदे यांनी दिला