19 अधीकारी 169 पोलीस व 50 होमगार्ड बंदोबस्तासाठी कराडात तैनात
कराड/प्रतिनिधीः-
गेल्या दहा दिवसापासून बाप्पाची मनोभावे पूजा अर्चा सुरू आहे. आता भक्तांना गणेश विसर्जनाचे वेध लागले आहे. मंगळवार दि. 17 रोजी अनंत चतुर्थी दिवशी कराड शहर व परिसरातील सार्वजनिक गणेश मंडळाचे विसर्जन येथील प्रीतिसंगावर होणार आहे. विसर्जन मिरवणूकांसाठी पोलिस व नगरपालिका प्रशासनाने जय्यद तयारी केली आहे. विसर्जन मिरवणूकीच्या बंदोबस्तासाठी 19 अधिकारी, 169 पोलिस कर्मचारी व 50 होमगार्ड असे एकूण 238 पोलिस कर्मचार्यांची नेमणूक करण्यात आली आहे. तर पालिका आरोग्य विभाग व अग्निशमन दली टिमही सज्ज आहे. पालिकाया वतीने प्रितीसंगमगाया वाळवंटातील तयारी पूर्ण करण्यात आली आहे. मंगळवारी दिवसभर मिरवणूक मार्गावरील नियमित वाहतूकीला बंदी करण्यात आली आहे.
11 दिवसांपासून सुरू असलेल्या गणेशोस्तवी मंगळवारी अनंत चतुर्थी दिवशी गणपती विसर्जनाने सांगता होत आहे. कराड शहरासह मलकापूर गोटे, मुंढे, वारूंजी, सैदापूर, विद्यानगर, बनवडी, गोवारे व ओगलेवाडी येथील सार्वजनिक मंडळाच्या गणेश मूर्तींचे प्रितिसंगमात विसर्जन करण्यात येते. शहरातील दत्त चौक ते चावडी चौक व कृष्णा नाका ते चावडी चौक व चावडी चौकातून पुढे प्रितीसंगमापर्यंत विसर्जन मिरवणूका काढण्यात येतात.
विसर्जन मिरवणूका निर्विघ्नपणे पार पडाव्यात यासाठी पोलिस प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. अपर पोलिस अधिक्षक, डिवायएसपी, वरीष्ठ पोलिस निरीक्षक यांच्यासह कराड शहर पोलिस स्टेशनाच्या 19 अधिकार्यांसह 169 पोलिस कर्मारी व 50 होमगार्ड विसर्जन मिरवणूकित बंदोबस्तासाठी तैनात असणार आहेत. दत्त चौक ते चावडी चौक व कृष्णा नाका ते चावडी चौक या मिरवणूक मार्गावर सर्व अंतर्गत रस्त्याने येणार्या वाहतूकीला बंदी करण्यात आली आहे. तसेच प्रितिसंगमात मूर्तींचे विसर्जन केल्यानंतर वाळवंटातून स्मशानभुमी मार्गे वाहने बाहेर पडणार आहेत.
नगरपालिकेच्या वतीनेही विसर्जनाची तयारी पुर्ण केली आहे. विसर्जनासाठी मुर्ती घेऊन येणार्या वाहनांसाठी वाळवंटात सपाटीकरण करून पार्कींगची सोय करण्यात आली आहे. तसेच वाळवंटातून स्मशानभुमिकडे जणारा रस्ता तयार करण्यात आला आहे. रात्री उशिरापर्यंत मुर्ती विसर्जन सुरू रहात असल्याने वाळवंटात टॉवर उभारून एलईडी लॅम्प लावून प्रकाशा ची सोय करण्यात आली आहे. तसेच नदीपात्रात अग्निशमन दलाची बोट व टिम तैनात करण्यात आली आहे. याबरोबरा नदीपात्रात आरोग्य विभागाचे 30 कर्माचारी व खासगी 40 स्वयंसेवकी टिम तैनात करण्यात आली आहे.