11.1 C
New York
Tuesday, November 19, 2024

Buy now

spot_img
spot_img

पाटण विधानसभेत बंडखोरी अटळ..!

शिवसेना ठाकरे गटातून हर्षद कदम यांना उमेदवारीःसत्यजितसिंह पाटणकर यांच्या भूमिकेकडे लक्ष

पाटण:-
पाटण विधानसभा निवडणूकीसाठी शिवसेना शिंदे गटातून मंत्री शंभुराज देसाई यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सत्यजितसिंह पाटणकर की शिवसेना ठाकरे गटाचे हर्षद कदम हा वरिष्ठ पातळीवर उमेदवार निश्चित करण्याच्या हालचाली सुरू असताना शिवसेना ठाकरे गटाचे हर्षद कदम यांचे शिवसेनेच्या पहिल्या यादीत नाव आल्याने शिवसेना ठाकरे गटाच्या समर्थकांच्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र पाटण विधानसभा मतदारसंघात देसाई – पाटणकर यांच्यात पारंपरिक लढत असलेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीतून हर्षद कदम यांचे नाव जाहीर झाल्याने राष्ट्रवादीचे सत्यजितसिंह पाटणकर यांची भूमिका काय राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

अजून काही जागांवर महाविकास आघाडीचा निर्णय प्रलंबित असताना पाटण विधानसभा मतदारसंघाच्या जागेवर बदल होऊ शकतो. असे पाटणकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांचे मत आहे. 1999 च्या निवडणुकीत शंभुराज देसाई यांनी शिवसेनेतून पहिली निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. 2004 च्या निवडणुकीत शिवसेनेतून निवडून आले. 2009 साली पुन्हा त्यांचा पराभव झाला. 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत शंभुराज देसाई शिवसेनेतून सलग निवडून आले. 1999, 2004, 2009 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विक्रमसिंह पाटणकर यांच्याशी लढत झाली तर 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत विक्रमसिंह पाटणकर यांचे सुपुत्र सत्यजितसिंह पाटणकर यांच्याशी लढत झाली. पारंपरिक लढत असलेल्या या मतदारसंघात मागील पाच निवडणूका शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस अशीच झाली आहे. 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत शिवसेनेचे शंभुराज देसाई निवडून आल्याने हा मतदार संघ शिवसेनेचाच मानला जात आहे. मात्र या मतदारसंघात पक्षीय राजकारणापेक्षा गटा – तटाच्या राजकारणाच्या पाठीमागे मतदार असल्याने मतदारसंघात देसाई – पाटणकर असेच तुल्यबळ दोन गट आहेत.

अडीच वर्षांपूर्वी घडलेल्या सत्तांतराच्या घडामोडीत शिवसेनेत दोन गट पडल्याने शंभुराज देसाई शिवसेना शिंदे घटात डेरेदाखल झाले. 2024 च्या चालू विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे शिंदे गट आणि ठाकरे गट समोरासमोर उभे टाकले असताना पाटण विधानसभा मतदार संघावर शिवसेना ठाकरे गटाने दावा सांगितला. तशी तयारी देखील त्यांनी सुरू केली. महाविकास आघाडीच्या वरिष्ठ पातळीवरील घडामोडीवर काय घडामोडी होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना शिवसेना ठाकरे गटाच्या पहिल्या यादीत जिल्हा प्रमुख हर्षद कदम यांचे नाव जाहीर झाल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. पारंपरिक निवडणूकीला यावेळी खंड पडणार का..? असा प्रश्न सर्वांसमोर पडला असताना राष्ट्रवादीचे सत्यजितसिंह पाटणकर शेवटच्या टप्प्यात महाविकास आघाडीकडे ताकद लावणार का महाविकास आघाडीला साथ देणार की अपक्ष लढणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या