3 C
New York
Wednesday, December 4, 2024

Buy now

spot_img
spot_img

फुटबॉल सामन्यात रेफरीचा वादग्रस्त निर्णय; 100 जणांचा मृत्यू

दोन्ही संघांमध्ये हाणामारी, प्रेक्षकही मैदानात घुसले

आफ्रिकन देश गिनीतील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर जेरेकोर येथे रविवारी फुटबॉल सामन्यादरम्यान झालेल्या हिंसाचारात सुमारे 100 लोकांचा मृत्यू झाला. न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार, रविवारी लबे आणि गेरेकोर फुटबॉल संघांमध्ये सामना सुरू होता. यादरम्यान मॅच रेफरीने वादग्रस्त निर्णय दिला, त्यामुळे दोन्ही संघांमध्ये हाणामारी झाली. हाणामारी होत असल्याचे पाहून प्रेक्षकही मैदानात घुसले आणि हिंसाचार सुरू केला.

या घटनेची माहिती देताना स्थानिक रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले की, रुग्णालयात मृतदेह रांगेत पडलेले आहेत. बाकीचे कॉरिडॉरमध्ये जमिनीवर पडलेले आहेत. शवगृह सुद्धा भरले आहे. हा सामना गिनी आर्मी आर्मी जनरल मामादी डुम्बौया यांच्या सन्मानार्थ आयोजित करण्यात आला होता. 2021 मध्ये गिनीमध्ये झालेल्या सत्तापालटात डुम्बौया यांनी सत्ता काबीज केली.

At least 100 people lost their lives in violent clashes between rival fans during a football match in Guinea Guinea Football Match : फुटबॉल सामन्यात मॅच रेफरीचा वादग्रस्त निर्णय, दोन्ही संघांमध्ये हाणामारी, प्रेक्षकही मैदानात घुसले; 100 जणांचा मृत्यू

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या