-1.1 C
New York
Friday, February 14, 2025

Buy now

spot_img
spot_img

वन्य प्राण्याच्या शिकारप्रकरणी पाच ऊसतोड मजुरांवर गुन्हा

कासारशिरंबे येथे वन विभागाची कारवाई; सापळ्यात अडकलेल्या बिबट्याची शेतात धूम

कराड/प्रतिनिधी :

कासारशिरंबे (ता. कराड) येथे ऊसतोड मजुरांनी शिकार करण्याच्या उद्देशाने लावलेल्या सापळ्यात एक बिबट्या अडकला. सदर बाब निदर्शनास आल्यानंतर गावच्या पोलीस पाटलांनी वनविभागात खबर दिली. त्यानंतर वनविभागाच्या पथकाने परिसरात शोधाशोध घेऊन वन्य प्राण्यांच्या शिकारप्रकरणी पाच ऊसतोड मजुरांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर वन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली.

या कारवाईत संशयितांकडून दोन बहेली सापळे, तारेचा पिंजरा, लाकडी मूठ असलेली टोकदार लोखंडी सळई, तीन वाघरं, एक नायलॉन रस्सी, क्लच वायरचा फास आदी शिकारीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. दरम्यान, सापळ्यात अडकलेल्या बिबट्याने उसाच्या शेतात धूम ठोकली.

प्रकाश बापूराव पवार, सुनिल दिलीप पवार, विशाल दिलीप पवार, मिथून भाऊराव शिंदे, भिमराव बाबुराव पवार, सर्व रा. भालकी ता. भालकी, जि. बिदर, (कर्नाटक), सध्या ऊसतोड मजूर कासारशिरंबे (ता. कराड) असे याप्रकरणी वन विभागाने घेऊन वन गुन्हा नोंद केलेल्यांची नावे आहेत.

याबाबत वन विभागाकडून मिळालेली माहिती अशी की, कासारशिरंबे (ता. कराड) येथील मारुती संभाजी बोंद्रे यांच्या उसाच्या शेतात एक बिबट्या वन्यप्राणी सापळ्यात अडकला होता. मंगळवार (दि. 28) रोजी सायंकाळी ही घटना निदर्शनास आल्यानंतर कासारशिरंबे गावचे पोलीस पाटील यांनी याबाबतची खबर वन विभागाला दिली. घटनेची माहिती मिळतात तात्काळ वनक्षेत्रपाल, वनपाल व वन कर्मचाऱ्यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी घाव घेतली. दरम्यान, पिंजऱ्यात अडकलेला बिबट्याने सापळ्याला हिसका देऊन उसाचे शेतात धूम ठोकली होती.

यावेळी वनविभागाच्या पथकाने परिसरात फिरून तपासणी केली असता कर्नाटक येथून कराड तालुक्यातील कासारशिरंबे येथे ऊसतोड करण्यासाठी आलेले मजूर प्रकाश पवार, सुनिल पवार, विशाल पवार, मिथून शिंदे, भिमराव पवार, सर्व रा. भालकी ता. भालकी, जि. बिदर, (कर्नाटक) यांच्याकडे दोन बहेली सापळे, तारेचा पिंजरा, लाकडी मूठ असलेली टोकदार लोखंडी सळई, तीन वाघरं, एक नायलॉन रस्सी, क्लच वायरचा फास आदी शिकारीचे साहित्य आढळून आले. याबाबत वन विभागाच्या पथकाने संशयितांकडे अधिक चौकशी केली असता शिकारीच्या उद्देशाने सापळा लावला असल्याचे समोर आले. त्यानंतर चौकशी अंती वनविभागाने पाच संशयित आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अन्वये वन गुन्हा नोंद केला आहे.

सदरची कार्यवाही उपवनसंरक्षक (सातारा) आदिती भारद्वाज यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वन संरक्षक महेश झांजुर्णे, वनपरिक्षेत्र अधिकारी (कराड) ललिता पाटील, वनपाल बाबुराव कदम, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, वनरक्षक दशरथ चिट्टे, अभिनंदन सावंत, कविता रासवे, वनसेवक अतुल कळसे, सतीश पाटील यांनी केली. याप्रकरणी वनक्षेत्रपाल ललिता पाटील तपास करीत आहेत.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या