8.3 C
New York
Wednesday, March 12, 2025

Buy now

spot_img
spot_img

घालमोड्यांचे सत्य आणि साहित्य संमेलन

कृष्णाकाठ / 25 फेब्रुवारी 2025 / अशोक सुतार  

घालमोड्यांचे सत्य आणि साहित्य संमेलन

 

आता काळ बदलला आहे. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर राजकीय चर्चा होतात, राजकीय पक्षांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारी राजकारणी मंडळीही आहेत, याची जाणीव नीलम गोर्‍हे यांच्या वादग्रस्त राजकीय  विधानाने झाली. असो. काळ बदलतो, तशी व्यवस्था संक्रमित होत असते. महात्मा फुलेंच्या घालमोडे दादांच्या विधानाबाबतीतील सत्य गेल्या १०० वर्षांनंतरही बदललेले नाही हे खरेच ! त्यामुळेच विद्यमान डॉ. तारा भवाळकरांनी, राजकारण्यांनी साहित्यिकांची जागा घेण्याचा प्रयत्न करू नये, असे दुर्गा भागवतांच्या कर्‍हाडमधील प्रसंगाचा दाखला देत म्हटलेले नाही ना ? अशी शंका येत आहे.

—————————————————————————

दिल्लीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नुकतेच झाले. प्रत्येक साहित्य संमेलनात अपेक्षा अशी असते की, जे साहित्य निर्माण होत आहे, त्याच्याबद्दल चर्चा व्हावी आणि जे कोणी ते साहित्य निर्माण करत असतील त्यांनी ती चर्चा करावी. परंतु दिल्ली येथील मराठी साहित्य संमेलनात राजकीय वक्तव्याची चर्चा झाली. नीलम गोर्‍हे, मर्सिडिज आणि राजकीय पक्ष यांवर चर्चा झाली. ही चर्चा होत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की, साहित्य संमेलनात बोलत असताना प्रत्येकानेच काही मर्यादा ठेवल्या पाहिजेत. साहित्यिकांना वारंवार वाटते की, राजकारणी मंडळींनी आमच्या संमेलनाच्या स्टेजवर येऊ नये, त्यामुळे त्यांनी देखील पार्टी लेव्हलवर बोलू नये, साहित्यिकांनी कुठल्याही पक्षाशी संबंधित बोलणे टाळलेच पाहिजे. फडणवीस यांचे बोलणे पाहता, साहित्यिकांनी कधी व्यक्त होऊ नये असेच त्यांना वाटत असावे. साहित्य संमेलनाचे व्यासपीठ पाहून राजकीय वाद निर्माण करणार्‍या राजकारण्यांना फडणवीस काहीच बोलत नाहीत, हे विशेष आहे.

गेले तीन दिवस दिल्लीतील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने राज्यात मराठी भाषेची चर्चा सुरू होती. परंतु व्यासपीठावरील नीलम गोर्‍हे यांनी राजकीय आरोप करत शिवसेना ठाकरे गटावर चिखलफेक केली. शिवसेना नेत्या, विधान परिषद उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी, ठाकरेंच्या सेनेत मर्सिडिज दिल्याशिवाय पद मिळत नव्हते अशा केलेल्या आरोपावर आता दोन्ही बाजूने घमासान सुरू आहे. याबाबत छेडले असता मी त्या पक्षात नव्हतो. त्या स्वतः त्या पक्षात असल्याने त्यांच्या पक्षात काय चालत होते त्याच उत्तम पद्धतीने सांगू शकतात असा सावध पवित्रा मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला. परंतु फडणवीस हे सांगायचे विसरले की, नीलम गोर्‍हे यांनी राजकीय वक्तव्य करण्याचे ते चुकीचे ठिकाण होते. साहित्यिकांना विशिष्ट नियम आणि राजकारण्यांना ते नियम का लागू नसावेत ?

प्रत्येकाने साहित्य संमेलनात बोलताना त्या ठिकाणी मर्यादा ठेवल्या पाहिजे. विशेषत: जे साहित्यिक आहे. साहित्यिकांना असे वाटत असेल तर राजकारण्यांनी येऊ नये, तर तशा पद्धतीचे वक्तव्य असेल, तर त्यांनी देखील पार्टी लाईनवरील ज्या कमेंट्स आहे, ते करणे योग्य नाही. त्यांनीही मर्यादा पाळल्या पाहिजेत, आशा शब्दांत फडणवीस व्यक्त झाले आहेत. परंतु ती वेळ निघून गेली होती. साहित्य संमेलनाची सुरुवात ज्या ग्रंथकार सभेपासून झाली, त्या सभेला महात्मा फुले यांनी पत्र लिहून म्हटले होते की, हे घालमोड्या दादांचे संमेलन आहे. तत्कालीन साहित्य संमेलनाचे स्वरूप म्हणजे उच्चवर्णीयांनी उच्चवर्णीयांसाठीच आयोजित केलेले संमेलन असेच होते. त्यामुळे महात्मा फुले यांनी घालमोड्या दादांचे संमेलनअसा शब्दप्रयोगी केला होता. आता त्यावेळची परिस्थिती राहिलेली नाही.

सध्या स्तरवर्गाची संमेलने होत असतात. म्हणजे, निरनिराळ्या व्यावसायिक आणि कष्टकरी लोकांची संमेलने होतात.ग्रामीण आणि अर्थ ग्रामीण भाषेमध्ये नव्याने लिहिणारे लेखक मोठ्या प्रमाणात येत आहेत. स्वातंत्र्योत्तर काळात जो नवशिक्षित वर्ग आहे आणि त्यांच्यामध्ये लिहिणारी मंडळी पुष्कळ आहेत. तसेच बोलीभाषेत लिहिणारी मंडळी अनेक आहेत. विशिष्ट उच्चस्तराच्या हातामध्ये यंत्रणा असतात आणि ते जे ठरवतात त्याप्रमाणे ते आयोजन सामाजिक क्षेत्रातील कुठल्याही संस्थेच्या कार्यक्रमाचे होत असते.

७० च्या दशकात जेव्हा जयप्रकाश नारायण तुरुंगात होते त्या आणीबाणीच्या वेळेस कराड येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात तत्कालीन संमेलनाध्यक्षा दुर्गाबाई भागवतांनी व्यासपीठावरून, राजकारण्यांनी व्यासपीठावर बसू नये असे सांगितले होते. कराड ज्यांचा मतदारसंघ आणि गाव असूनही तत्कालीन संरक्षणमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण कराड येथील साहित्य संमेलनात पहिल्या रांगेमध्ये खुर्चीत खाली समोर बसलेले होते. आपल्या महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ साहित्यिका सांगते की, साहित्यिकांच्यामध्ये राजकारण्यांनी प्रवेश करू नये. त्यांनी रसिक म्हणून जरूर यावे, संयोजनात सहभाग घ्यावा. परंतु साहित्यिकांची जागा त्यांनी व्यापू नये. साहित्यिक विचारांचे स्व. यशवंतराव चव्हाण हे किती सर्‍हदयी, विवेकशील असतील ?

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या