10.8 C
New York
Sunday, April 6, 2025

Buy now

spot_img
spot_img

राष्ट्रप्रेम जागवणारा नंदादीप विझला

कृष्णाकाठ / दि. ०५ एप्रिल २०२५ / अशोक सुतार 

राष्ट्रप्रेम जागवणारा नंदादीप विझला

‘मेरे देश की धरती, सोना उगले…’ असे गाणे गात १९६७ साली उपकार चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये अभिनेते मनोजकुमार यांनी खळबळ माजवली. त्यानंतर मनोज कुमार आणि देशप्रेमाचे चित्रपट असे समीकरणच बनले. बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते व दिग्दर्शक मनोज कुमार यांचे वयाच्या ८७व्या वर्षी निधन झाले आहे. मुंबईतील कोकिलाबेन धीरूबाई अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या बर्‍याच दिवसांपासून मनोज कुमार आजारी होते. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण, मनोज कुमार यांची प्राणज्योत मालवली. त्यामुळे बॉलीवूडमध्ये शोककळा पसरली आहे. मनोज कुमार यांना आजवरच्या कारकिर्दीमध्ये अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले. मनोजकुमार यांनी राष्ट्रप्रेमावर चित्रपटांची निर्मिती केली. त्यामुळे त्यांचे चित्रपट भारतभर पोहोचले आणि रसिकांनी पसंत केले. राष्ट्रप्रेम जागवणारा नंदादीप विझला असेच मनोज कुमार यांच्या मृत्यूनिमित्त म्हणता येईल.  

दि. ९ ऑक्टोबर १९५६ साली चित्रपटात हिरो बनण्याचे स्वप्न उराशी घेऊन वयाच्या १९ व्या वर्षी मनोज कुमार यांनी दिल्लीहून मुंबई गाठली. १९५७ मध्ये पहिल्या चित्रपटात १९ वर्षांच्या मनोज कुमार यांनी एका ८०-९० वर्षांच्या भिकारीची छोटीशी भूमिका केली. हरिकिशन गोस्वामी असे मनोजकुमार यांचे मूळ नाव होते, जे नंतर बदलले गेले. बॉलीवूडमधील मोलाच्या योगदानासाठी मनोज कुमार यांना पद्मश्रीपासून ते दादासाहेब फाळकेपर्यंत पुरस्कारापर्यंत गौरविण्यात आले. त्यांच्या चित्रपटात राष्ट्रद्रोह, भ्रष्टाचारावर परखड भाष्य केले जात असे. त्यामुळे रसिकांचा उदंड प्रतिसाद त्यांच्या चित्रपटांना लाभला.

मनोज कुमार यांच्या उपकार चित्रपटाला राष्ट्रीय सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला होता. १९६७ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात मनोज कुमार, आशा पारेख आणि प्रेम चोप्रा मुख्य भूमिकेत झळकले होते. उपकार या चित्रपटाने भारतात त्यावेळी सर्वात जास्त म्हणजे ३.४० कोटींची कमाई केली होती. त्यानंतर १९९२ मध्ये पद्मश्री पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले होते. भारतातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक पद्मश्री हा पुरस्कार मनोज कुमार यांना भारतीय सिनेसृष्टीतील त्यांच्या उत्कृष्ट योगदानासाठी प्रदान करण्यात आला होता. तसेच २०१५ मध्ये मनोज कुमार यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान केला गेला. खरे तर अभिनेते मनोज कुमार यांना भारत कुमार म्हणणे योग्य ठरले असते.

अभिनते मनोजकुमार यांच्या फिल्मफेअर पुरस्कारांची यादी फार मोठी आहे. १९६८ साली देशातील सर्वोत्कृष्ट चित्रपट उपकार म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला. त्याचवर्षी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून त्यांचा गौरव झाला. त्यांनी निर्मिती केलेल्या उपकार चित्रपटाच्या कथेला सर्वोत्कृष्ट कथा, संवाद म्हणून गौरव झाला. १९६९ साली मनोजकुमार यांना बेइमान चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून निवड झाली. शोर चित्रपटासाठी १९७२ मध्ये सर्वोत्तम संपादनचा पुरस्कार मिळाला. त्याचवर्षी रोटी कपडा और मकान या चित्रपटासाठी उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून सन्मान मिळाळा. १९९९ साली त्यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मनोज कुमार यांना सरदार पटेल जीवनगौरव आंतरराष्ट्रीय पुरस्कार, स्टार स्क्रीन जीवनगौरव पुरस्कार,१२व्या मुंबई चित्रपट महोत्सवात जीवनगौरव पुरस्कार,अप्सरा फिल्म अँड टेलिव्हिजन प्रोड्यूसर्स गिल्ड पुरस्कार सोहळ्यात जीवनगौरव पुरस्कार, नाशिक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जीवनगौरव पुरस्कार,न्यू जर्सी, युनायटेड स्टेट्स येथे भारत गौरव पुरस्कार, जागरण चित्रपट महोत्सवात जीवनगौरव पुरस्कार, बीएफजेए (बॉलीवूड फिल्म जर्नलिस्ट अवॉर्ड्स) मध्ये पॉवर ब्रँड्सकडून जीवनगौरव पुरस्कार, कलैमामणि पुरस्कार असे अनेक मानाचे पुरस्कार मिळाले.

मनोज कुमार यांचे पूर्ण नाव हरिक्रिशन गिरी गोस्वामी असून दि. २४ जुलै १९३७ साली त्यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू नुकताच म्हणजे काल दि. ४ एप्रिल २०२५ रोजी झाला. ते हिंदी चित्रपटसृष्टीत काम करणारे भारतीय अभिनेते, चित्रपट दिग्दर्शक, पटकथा लेखक, गीतकार आणि संपादक होते. ते भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सर्वात यशस्वी आणि उत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक होते. ते देशभक्तीपूर्ण अभिनय आणि चित्रपट निर्मितीसाठी ओळखले जात होते आणि त्यांना भारत कुमार हे टोपणनाव देण्यात आले. भारतीय चित्रपट आणि कलांमधील योगदानाबद्दल त्यांना १९९२ मध्ये पद्मश्री आणि २०१५ मध्ये चित्रपट क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांना विविध श्रेणींमध्ये राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि सात फिल्मफेअर पुरस्कार मिळाले.

मनोज कुमार यांचा जन्म ब्रिटिश भारताच्या (सध्याच्या खैबर पख्तूनख्वा, पाकिस्तान) वायव्य सरहद्द प्रांतातील अबोटाबाद येथील एका पंजाबी हिंदू ब्राह्मण कुटुंबात झाला. जेव्हा ते १० वर्षांचे होते, तेव्हा फाळणीमुळे त्यांचे कुटुंब जंदियाला शेरखान येथून दिल्लीला स्थलांतरित झाले. मनोज कुमार यांनी चित्रपटांमध्ये नशीब आजमावण्यापूर्वी हिंदू कॉलेजमधून कला शाखेची पदवी घेतली. फॅशन (१९५७) या हिन्दी चित्रपटातून पदार्पण केल्यानंतर, सहारा (१९५८), चांद (१९५९) आणि हनीमून (१९६०) सारख्या चित्रपटांमध्ये विसरता येण्याजोग्या भूमिका केल्यानंतर, त्यांना कांच की गुडिया (१९६१) मध्ये त्यांची पहिली मुख्य भूमिका मिळाली. त्यानंतर पिया मिलन की आस (१९६१), सुहाग सिंदूर (१९६१), रेश्मी रूमल (१९६१) मध्ये त्यांची भूमिका आली, परंतु त्यापैकी बहुतेक चित्रपटांचा मागमूसही उरला नाही. १९६२ मध्ये विजय भट्ट यांच्या माला सिन्हा यांच्या विरुद्ध असलेल्या हरियाली और रास्ता या चित्रपटाने त्यांना पहिले मोठे व्यावसायिक यश मिळाले. मनोज कुमार यांनी राष्ट्रप्रेमावरील चित्रपटांची निर्मिती केली आणि त्यांच्या चित्रपटांना भारतातील रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. त्यांनी रसिकांच्या मनावर बराच काल अधिराज्य केले.

 

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या