महाबळेश्वर /संजय चोरगे:-
प्रदीर्घ कालावधीनंतर ऑगस्ट महिन्यात महाबळेश्वर नगरपालिका पंचवार्षिक निवडणुकीचे बिगुल अखेर वाजल्याने प्रस्थापितांसोबत इच्छुकांच्या मोर्चे बांधणीला वेग आला खरा पण आरक्षणाचा तिढा अद्यापही कायम असल्याने इच्छुकांची गोची झाल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच आज सोमवार दिनांक ६ ऑक्टोबर रोजी महाबळेश्वर च्या लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाची सोडत नागरिकांच्या खुल्या प्रवर्गासाठी जाहीर झाल्याने आगामी पंचवार्षिक निवडणुकी मध्ये महाबळेश्वरच्या राजकारणामध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता जाणकारांच्या वतीने वर्तवली जात आहे.
“क” वर्गातील सर्वात श्रीमंत असलेल्या पालिकेचे आगामी काळामध्ये सारथ्य करण्यासाठी महाबळेश्वर कर कोणाची निवड करणार हे आगामी काळात कळेलच परंतु तत्पूर्वी ही निवडणूक नक्की कोणत्या मुद्द्यांवर लढवली जाणार हे पाहणे देखील औत्सुक्याचे ठरणार आहे.