spot_img
spot_img
spot_img
spot_img

विट्यात मोठा राजकीय भूकंप ! अनिल म. बाबर यांना भाजपाने डावलले

विट्यात मोठा राजकीय भूकंप ! अनिल म. बाबर यांना भाजपाने डावलले

विट्यात मोठी खळबळ ; राजकारणाला वेगळे वळण

विटा / शिराज शिकलगार

सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा नगरपालिका निवडणूक लक्षात घेता सर्व पक्ष आणि अपक्षांसह सोमवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस दुपारी तीनपर्यंतच होता. त्यामुळे भाजप व शिवसेना शिंदे गट सह अन्य पक्ष, अपक्ष उमेदवारांनी आपले उमेदवार अर्ज दाखल केले. सुरवातीला अनिल म. बाबर यांच्या सौभाग्यवतींना भाजपकडून नगराध्यक्षापदासाठी तिकीट दिले जाणार, अशी चर्चा प्रभागात वार्‍याप्रमाणे घुमू लागली. तेव्हापासून अनिल म. बाबर यांनी त्या पद्धतीने प्रचारही सुरू केला. सुरुवातीपासून गेली चार ते पाच दिवस यावर चर्चाही झाली. पण शनिवारपासून अनिल म. बाबर यांनी भाजपचे जेष्ठ नेते माजी आमदार सदाशिवराव पाटील व युवा नेते वैभव पाटील यांच्याकडे, आपणाला पाच ते सहा जागा दिल्या पाहिजेत, तरच आपले जुळेल असा हट्ट करत मागणी केली. मात्र, भाजपकडून अनिल म. बाबर यांची समजूतही काढण्याचा प्रयत्न केला. पण अनिल म. बाबर याच गोष्टीवर ठाम राहिले. शेवटी भाजपच्या नेत्यांचा हा वरिष्ठ पातळीवरील निर्णय आहे, असे म्हणत अनिल म. बाबर यांच्या मागण्या डावलल्या गेल्या. शेवटच्या टप्प्यात अनिल म. बाबर व पाटील गटात नाराजीचा सूर झाल्याने विट्यात मोठी राजकीय खळबळ दिसून आली. अनिल म. बाबर यांचा स्वतंत्र लढण्याचा निर्णय त्यांना राजाकीय लाभाचा ठरणार की आणि पुढे काय होणार, अशी चर्चा सर्वत्र रंगली आहे.

खात्रीशीर मिळालेल्या माहितीनुसार, भाजपचे जेष्ठ नेते माजी आमदार सदाशिवराव पाटील व युवा नेते वैभव पाटील यांना पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटीलसह वरिष्ठ नेत्यांनी हा निर्णय तुम्ही घेऊ शकता, असा सल्ला दिल्यानंतर पाटील गटाने भाजपचे जेष्ठ नेते अनिल म. बाबर यांच्या मागण्या डावलल्या. त्यामुळे अनिल म. बाबर यांना भाजपचा हा दणका बसल्याने विट्यात मोठी राजकीय खळबळ दिसून आली. विट्यात मोठा राजकीय भूकंप झाल्याने शेवटच्या टप्प्यात अनिल म. बाबर व पाटील गटात नाराजीचा सूर झाल्याने अनिल म. बाबर यांनी पाटील गटाला कोणताच प्रतिसाद न दिल्याने ते बैठकीतून बाहेर पडले.

अनिल म. बाबर यांच्या मागण्या पाटील गटाला मान्य नसल्याने बाबर यांनी स्वतःच बाहेर पडण्याचा  निर्णय घेतल्याचे समजते. त्यामुळे आता भाजप नगराध्यक्षांची माळ कोणाच्या गळ्यात टाकणार, हे पाहणे गरजेचे आहे. पाटील गटाकडून अनेकांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे समजते. सोमवारी अर्ज भरण्याचा शेवट दिवस असल्याने अनेकांनी आपले उमेदवारी अर्ज दोन्ही गटाकडील पक्षांनी दाखल केले. आता खरी लढत अर्ज कोणकोण माघारी काढणार आणि कोण ठेवणार त्यानंतरच विटा नगरपालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल. विटा नगरपालिका निवडणुक लक्षवेधी व रंगतदार होणार असल्याची चर्चा विटेकर नागरिकांतून होत आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या