शिक्षण मंडळ कराड संचालित आत्माराम विद्यामंदिर ओगलेवाडी येथे दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री संतोष चामलवाड (विशेष शिक्षक गट साधन केंद्र,पंचायत समिती कराड) उपस्थित होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, योग ही भारताची प्राचीन परंपरा आहे. योगासनामुळे व्यक्ती स्वस्थ व निरोगी राहू शकते. व्यक्तिमत्व विकासासाठी योगासने महत्त्वाचे आहेत. तणावमुक्त जीवनासाठी योग उपयुक्त आहे. यावेळी शिक्षक महेश कुंभार आणि राहुल खाडे यांनी विद्यार्थ्यांना योगासनाची व प्राणायामाची प्रात्यक्षिके दाखवली तसेच विद्यार्थ्यांकडून करून घेतली. योग दिनाचे औचित्य साधून कु .आराध्या भोसले आणि कु. शिवांजली भोसले या विद्यार्थिनींनी योगासनातील काही विशेष प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांना दाखवली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडाशिक्षक प्रदीप बंडगर यांनी केले. कार्यक्रमाचे आभार क्रीडा विभाग प्रमुख चंद्रकांत काळे यांनी मानले.