8.6 C
New York
Friday, October 11, 2024

Buy now

spot_img
spot_img

महायुतीचे उमेदवार म्हणून आ.दत्तात्रय भरणे यांचे नाव फिक्स झाल्याची सूत्रांची माहिती..?

सीटिंग आमदार म्हणून भरणे यांना भाजप,राष्ट्रवादी, शिवसेने कडून प्राधान्य…?
जितेंद्र जाधव
इंदापूर/ प्रतिनिधी:-
राज्यामध्ये लोकसभा निवडणुका नंतर विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. याच वर्षाच्या शेवटच्या काही महिन्यांमध्ये निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल. मात्र या निवडणुकी अगोदर इंदापूर विधानसभा मतदारसंघाचा पेज काही प्रमाणात सुटला असल्याची माहिती सूत्रांच्या माध्यमातून मिळत असून आमदार दत्तात्रय भरणे हे इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढणार असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून मिळत असून तशी गावोगावी आमदार भरणे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.
इंदापूर विधानसभा मतदारसंघ कायम चर्चेत राहिलेला मतदार संघ आहे. या मतदारसंघात अजित पवार यांचे विश्वासू विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे व राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे महायुतीकडून दोन ताकतवान नेते इंदापूर विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक असून दोन्हीही नेत्यांच्या कार्यकर्त्यांकडून या मतदारसंघावर दावा करण्यात आला आहे. त्यातच आमदार दत्तात्रय भरणे हे इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार असल्यामुळे भरणे यांना महायुतीचे उमेदवार म्हणून अधिक प्राध्यान्य वरिष्ठ नेत्यांकडून दिले गेल्याची माहिती समोर येत आहे.
त्यामुळे वरिष्ठ नेत्यांकडून आमदार दत्तात्रय भरणे यांना या विधानसभेच्या निवडणुकीबाबत महायुतीचे उमेदवार म्हणून हिरवा कंदील मिळाला असल्याची सूत्रांची माहिती आहे.इंदापूर तालुक्यात आमदार भरणे यांच्या कार्यकर्त्यांकडून काही ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे. तसेच येणाऱ्या काळात आमदार भरणे हे इंदापूर विधानसभेची निवडणूक भाजप,राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेना महायुतीचे उमेदवार म्हणून राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढणार असल्याचे फिक्स झाल्याची माहिती समोर येत आहे.
या कारणांमुळे आमदार भरणे यांची महायुती कडून उमेदवारी फिक्स…?
‌• विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्वासू आमदार म्हणून भरणे यांची ओळख.
• राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटी नंतर खा.शरद पवार यांना डावलून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा घेतलेला निर्णय.
• लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांना विजयी करण्यासाठी सुप्रिया सुळे यांना उघड केलेला कडवा विरोध.
• इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे असलेले विद्यमान आमदार म्हणजेच सेटिंग आमदार भरणे यांच्या पथ्यावर.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या