सातारा / प्रतिनिधी
किल्ले सज्जनगड मार्गावर सज्जनगड फाटा ते सज्जनगड या वळणावर दरड पडल्यामुळे येथील वाहतूक ठप्प झाली आहे. ठोसेघर, सज्जनगड परिसरात पावसाची उघडझाप सुरू असली तरी पावसाचा जोर कायम आहे. या परिसरात रस्त्यावर दरड कोसळण्याचे प्रकार सुरूच असतात. काल ठोसेघर रस्त्यावर मोठ-मोठी दगडी आली होती तर गुरुवारी सज्जनगड रस्त्यावर मोठे दगड झाडे पडल्यामुळे चार चाकी वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे. दुपारी बारा वाजेपर्यंत कोणतीही शासकीय यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली नव्हती.