-0.3 C
New York
Sunday, December 1, 2024

Buy now

spot_img
spot_img

साताऱ्यात बेंदूर सणाच्या मुहूर्तावर वाघ नखे येण्याची शक्यता..

सातारा दि: छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे प्रतीक असलेले वाघनखे सध्या इंग्लंडच्या म्युझियम मध्ये आहेत . ही वाघनखे साताऱ्यात ठेवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात जय्यत तयारी झाली आहे . शेतकऱ्यांचा सण म्हणजे बेंदूर या दिवशी ही ऐतिहासिक व शिवकालीन  वाघनखे यांचे सातारा शहरात आगमन होईल. अशी शक्यता अधिकृत सूत्रांकडून वर्तवण्यात आलेली आहे. याबाबत अधिकृत घोषणा झाली नसली तरी पुढील पंधरा दिवसात प्रत्यक्षात वाघनखे साताऱ्यात येतील असे शिवप्रेमींना वाटू लागलेले आहे.
        पोलादीपट्टीवर पाच इंच अंतर व चार सव्वा इंच लांबीचे तीक्ष्ण वाघनखे व त्याला तिन्ही बाजूने शिरा व खालच्या बाजूला धार असलेले दोन्ही बाजूच्या अंगठ्या असणारी ही वाघ नखे सध्या इंग्लंडच्या म्युझियम मध्ये असून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचा वापर केला होता .असा इतिहास तज्ञांचे मत आहे. हीच वाघनखे पुन्हा साताऱ्यात येणार आहे. वास्तविक पाहता राजा जयसिंग यांनी तयार केलेली पोलादी धातूची वाघ नखे  असल्याची इतिहासात नोंद आहे .
या वाघनख्यासाठी खबरदारीचे उपायोजना  छत्रपती शिवाजी प्राचीन वस्तू संग्रहालय सातारा या ठिकाणी सी.सी.टी.व्ही. व  ग्रील दरवाजा व  सेंसर असल्यामुळे या वाघनख्याची सुरक्षा भेदून कोणालाही आत जाता येणार नाही. अशी चोख व्यवस्था छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाचे अधीक्षक प्रवीण शिंदे यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे. संग्रहालय परिसरातील रस्त्यावरील टपऱ्या बाजूला करण्यात आले असून यासाठी पुरातन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सातारा नगरपरिषदेची पत्र व्यवहारी केला होता . त्याप्रमाणे टपऱ्या बाजूला करण्यात आलेले असून वडापच्या गाड्यांनीही शिस्तीचे पालन करून सहकार्य करावे. अन्य त्याही बाजूला केल्या जातील असा इशारा दिला आहे. सातारचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या कारकिर्दीमध्ये साताऱ्यात शिवरायांची वाघ नखे येत आहेत याचा मनस्वी आनंद नक्कीच सर्वांना झाला आहे.
छत्रपती शिवरायांनी प्रतापगडावर अफजलखान वधावेळी वापरलेली वाघनखे आज कुठे आहेत,? याचा नेमका ठावठिकाणा सांगता येत नाही; पण इंग्लंडस्थित व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियममध्ये शिवरायांची म्हणून एक वाघनखे ठेवलेली आहेत . ती वाघनखे या म्युझियमला मराठ्यांचा आद्य इतिहासकार ग्रँट डफ यांचा वंशज अँड्रियन ग्रँट डफ यांच्याकडून भेट म्हणून मिळालेली होती.
छत्रपती शिवरायांनी व मावळ्यांनी वापरलेले काही शस्त्रांची प्रतिमा जावळी खोऱ्यातील मेढा नगरपंचायतीने
 जनतेच्या माहितीसाठी रस्त्याच्या दुभाजकावर शिवकालीन शस्त्र उभी करून खऱ्या अर्थाने छत्रपती शिवरायांच्या आठवणींना उजाळा दिलेला आहे. त्याचीही आठवण यानिमित्त शिवप्रेमी करू लागलेले आहेत हा जावळी खोऱ्याचा गौरव ठरला आहे.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या