मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित, प्रशासन सज्ज
सातारा/प्रतिनिधी
छत्रपती शिवरायांच्या काळातील ऐतिहासिक वाघ नखांचे शुक्रवार दिनांक 19 रोजी साताऱ्यात आगमन होत असून या वाघनखांच्या भव्य स्वागतासाठी सातारा जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे .या भव्य कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजित दादा पवार हे उपस्थित राहणार असून प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात आहे ही वाघ नखे येथील छत्रपती शिवाजी संग्रहालयात दहा महिने राहणार आहे या निमित्ताने संग्रहालयाचे उद्घाटन केले जाणार असून हे संग्रहालय सर्वसामान्यांसाठी खुले होणार आहे .
लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्यूझियम मध्ये असणारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वापरातील वाघनखे राज्य सरकार भारतात आणत आहे .यासाठी ब्रिटन सरकार व राज्य सरकार यांच्या तीन वर्षाचा करार झाला असून त्या पोटी राज्य सरकार ब्रिटन सरकारला भाडे देणार आहे .ही वाघनखे शुक्रवार दिनांक 19 जुलैला साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या संग्रहालयात ठेवण्यात येणार आहे या वाघांच्या स्वागतासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे . छत्रपती शिवाजी संग्रहालयामध्ये संग्रहालयाच्या दर्शनी भागामध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत ही वाघनखे ठेवली जाणार असून या वाघ नखांची सातारकरांना प्रचंड उत्सुकता आहे
त्यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार ,पालकमंत्री शंभूराजे देसाई,खासदार उदयनराजे भोसले, माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार पृथ्वीराज चव्हाण, आमदार शशिकांत शिंदे, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार मकरंद पाटील, आमदार जयकुमार गोरे, आमदार दीपक चव्हाण ,आमदार महेश शिंदे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधीक्षक समीर शेख या सर्व मान्यवरांची प्रमुख उपस्थिती या सोहळ्याला असणार आहे
शुक्रवारी सकाळी दहा वाजता पहिल्यांदा संग्रहालय परिसरात वाघनखांचे मान्यवरांच्या हस्ते स्वागत होणार आहे .संग्रहालय पाहणी त्यानंतर जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण ऑडिटोरियम मध्ये पुढील कार्यक्रम होणार आहे . वाघ नखांच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर संग्रहालय परिसरात स्वच्छता तेथील अतिक्रमणे ही हटवण्यात आली आहेत प्रत्येक विभागावर एक एक जबाबदारी देण्यात आलेली आहे वाघनखे किंवा संग्रहालय पाहणीस येणाऱ्या पर्यटक व इतिहास प्रेमींच्या वाहन पार्किंग करण्याच्या ठिकाणाची तयारी सुरू आहे