-0.3 C
New York
Sunday, December 1, 2024

Buy now

spot_img
spot_img

कोयना धरणाचे दरवाजे 11 फुटांवर

52 हजार 100 क्युसेक्स पाणी नदीपात्रात

सातारा

कोयना धरणाच्या सांडव्यावरून नदीपात्रात विसर्ग वाढवण्यात आला असून सकाळी नऊ वाजेपासून 52 हजार 100 क्युसेक्स पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे. त्यामुळे कोयना व कृष्णा नदीपात्रात वाढ होणार असल्याने नदीपात्राजवळील नागरीकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. धरणाचे दरवाजे 11 फु टाने उचलले आहेत. पावसाचा जोर असाच राहिला तर आणखी येव्यानुसार वाढ करण्यात येईल असे धरण व्यवस्थापनाने सांगितले.

जिल्ह्यात पाऊस वाढत असून हवामान विभागाने शनिवारपर्यंत ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळे पावसाच्या प्रमाणात वाढ होणार आहे. तर आजही पावसाचा जोर कायम राहिला आहे. दिवसभरामध्ये नवजात 49 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. धरणाचे दरवाजे 9 फुटांवर स्थिर आहेत. धरणामध्ये 45 हजरा 280 क्युसेक्स पाण्याची आवक होत असल्याने रात्री 9 वाजता धरणातून 52 हजार 100 क्युसेक्स पाणी नदीपात्रात सोडण्यात आले असून धरणामध्ये 86.89 टीएमसी पाणीसाठा आहे.

 

जिल्ह्याला मागील आठवड्यात जोरदार पावसाने झोडपून काढले. सलग दहा दिवस धो-धो पाऊस कोसळत होता. पूर्व भागातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव आदी तालुक्यांतही चांगला पाऊस पडला. यामुळे खरीप हंगामातील पिकांना फायदा झाला आहे. तर पश्चिम भागात धुवॉधार पाऊस झाला. कोयना, नवजा, तापोळा, महाबळेश्वरसह संपूर्ण कांदाटी खोर्‍यात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. तसेच धोम, बलकवडी, कण्हेर, उरमोडी, तारळी, कोयनासारख्या प्रमुख धरणांतही मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला. त्यामुळे विसर्ग सुरू करावा लागला. मात्र, पाच दिवसांपासून पावसाचे प्रमाण कमी झाले होते. दोन दिवस उघडझाप सुरू राहिली. पण, बुधवारपासून पाऊस पुन्हा वाढू लागला आहे. गुरूवारीही सकाळपासून पाऊस सुरूच होता.

÷गुरूवारी सकाळपर्यंतच्या 24 तासांत कोयनानगर येथे 88 मिलिमीटर पर्जन्यमान झाले. तर एक जूनपासून आतापर्यंत 3 हजार 763 मिलिमीटर पाऊस झाला आहे. नवजा येथे आतापर्यंत 4 हजार 436 मिलिमीटर पाऊस पडला. जिल्ह्यात पाथरपूंज नंतर नवजा येथेच सर्वाधिक पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. तर महाबळेश्वरला 24 तासांत 84 तर दोन महिन्यांत 4 हजार 98 मिलिमीटर पाऊस पडला आहे. पाऊस वाढल्याने कोयना धरणात येणार्‍या पाण्याचीही आवक वाढत चालली आहे.

सकाळच्या सुमारास सुमारे 45 हजार क्यूसेक वेगाने पाणी येत होते. तर धरणातील पाणीसाठा 85.81 टीएमसी झाला होता. त्यातच मागील काही दिवसांपासून धरणातून विसर्ग सुरू आहे. पायथा वीजगृहातून 2 हजार 100 क्यूसेक वेगाने पाणी सोडले जाते. त्याचबरोबर धरणाच्या सर्व सहा दरवाजातूनही 40 हजार क्यूसेक विसर्ग कायम आहे. सध्या धरणाचे दरवाजे नऊ फुटांवर स्थिर आहेत.

धोम धरणांतून विसर्ग वाढला.

वाई तालुक्यातील धोम धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस वाढला आहे. त्यामुळे धरणातही मोठ्या प्रमाणात पाणी आवक आहे. धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी विसर्ग वाढविण्यात येणार आहे. सकाळच्या सुमारास 3 हजार 364 क्यूसेक वेगाने पाणी सोडण्यात येत होते. दुपारपासून सांडव्यावरुन सुमारे 4 हजार 300 क्यूसेकपर्यंत विसर्ग करण्याचे नियोजन करण्यात आलेले होते. त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या