कराड/प्रतिनिधी:-
आगाशिवनगरात दोन समाजाच्या व्यावसायिकांमध्ये सोमवारी रात्री मारहाण झाली होती. या मारहाण प्रकरणात मंगळवारी भाजपचे आमदार नितेश राणे यांची एंंन्ट्री झाली. आमदार राणे यांनी मारहाण झालेल्या पवार कुटुंबांची भेट घेतली. गुन्हा नोंद करायला गेलेल्या पवार कुटुंबांला पोलिसांकडून अपशब्द वापरल्याचे समजताच ते पोलिसांवर भडकले व पोलिसांना चांगलेच फैलावर घेतले. या वेळी कांहीकाळ आगाशिवनगरला पोलिस छवणीचे स्वरुप प्राप्त झाले होते.
आगाशिवनगर मलकापूर ता. कराड येथे सोमवारी दोन समाजातील व्यावसायिकांच्यात भांडण झाले होते. त्या भाडणाचे रूपांतर हाणामारीत झाले.
या झालेल्या मारहाणीवरून कराड शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत तणावाचे वातावरण होते. या प्रकारानंतर मंगळवारी पोलिसांनी काही लोकांवर गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे. मात्र हे भांडण दोन समाजात तढ निर्माण हैण्याकडे झुकले होते. या प्रकरणी मंगळवारी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी आगाशिवनगरात इंन्ट्री केली. त्यांनी मारहाण झालेल्या पवार कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. यावेळी पवार कुटुबासह जमलेल्या नागरिकांनी संबंधित व्यावसायिकाच्या आरेरावीचा राणे याच्यासमोर पाडाच वाचला. त्याचबरोबर गुन्हा नोंद करायला गेलेल्या पवार कुटुंबाला पोलिसांकडून अपशब्द वापरल्याचे पवार यांनी सांगितले. यावेळी राणे यांनी पोलीसांना फोन लावला आणि चांगलेच फैलावर घेतले. या प्रकरणात पोलिसांनी मारहाण झालेल्या कुटुंबाला चुकीची वागणूक दिल्याचे समजताच आमदार नितेश राणे यांनी संबंधित पोलिस अधिकार्याला फोनवरून कडक भाषेत समज दिली. तसेच याप्रकरणी सर्व घडामोडी देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर घालणार असले सांगितलें. दरम्यान या प्रकरणावरून बुधवारी कराड बंदची सकल समाजाने दिलेली हाक मागे घेतली असून प्रशासनाला याबाबत निवेदन देणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी सकल मराठा समाजाच्या हजारो लोकांची उपस्थिती होती. आमदार नितेश राणे यांच्या फोन नंतर कराडची डी वाय एस पी अमोल ठाकूर, शहर पोलीस ठाण्याचे के एन पाटील यांच्यासह पोलीस फौज फाटा आगाशिवनगर येथे दाखल झाल्याने आगाशिवनगरला पोलिस छावनीचे स्वरूप प्राप्त झाले होते. तर आमदार नितेश राणे यांच्या घेण्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.