आठ वर्षानंतर शिवंद्रराजे जलमंदिरात
सातारा/प्रतिनिधीः-
अनेक वर्षानंतर पहिल्यांदाच आ.शिवेंद्रराजे भोसले जलमंदिर पॅलेस मध्ये आल्याने अनेकांच्या भुया उंचावल्या सातारच्या राजकीय राजकारणात देखील दोन्ही भावांच्या भेटीची चर्चा लागली रंगू काही दिवसापूर्वी सातारा जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे आजारी असल्यामुळे त्यांना पाहण्यासाठी खासदार उदयनराजे भोसले हे सुरुची बंगला गेले होते मात्र त्यांची आणि आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट न झाल्याने आज शिवेंद्रसिंहराजे भोसले आपल्या थोरल्या बंधूराजांना भेटण्यासाठी जलमंदिर पॅलेस मध्ये गेले होते या वेळेला तब्येतीच्या विचारपूस तर झालीच त्याच बरोबरच दोन्ही राजे बंधू मध्ये राजकीय चर्चा देखील झाली त्यामुळे अनेक राजे विरोधकांच्या भुया उंचावल्या आहेत.
आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आमदारकीच्या प्रचाराला आत्तापासूनच सुरुवात केल्याची चर्चा आता सातार्यात सुरू झाली असून विरोधकांनी देखील या दोन्ही राज्यांच्या भेटीचे चांगलीच जास्त घेतल्याचं दिसून येत आहे.
वर्षापासून दोन्ही राजांच्यात असलेलं वैरत्व सर्वांनाच माहित आहे त्यामुळे एकमेकांच्या बंगल्यावर जाणे येणे या दोन्ही राजेंचे बंद होते मात्र लोकसभेच्या निवडणुकीपासून दोन्ही राज्यांचे मनोमिलन झाल्याने हे आता दोन्ही राजे एकमेकांच्या घरात येऊ लागले आहेत त्यामुळेच अनेक वर्षानंतर आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले देखील जलमंदिर पॅलेस मध्ये आल्याचे पहिला मिळाले आहे
सातार्याचे राजकारण उदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजे यांच्या भोवती सातत्याने फिरत राहिले आहे. राजघराण्यातील या बंधूमध्ये कधी राजकीय विरोध, तर कधी राजकीय मनोमिलनही पाहण्यास मिळाले आहे. आठ वर्षापूर्वी सातारा पालिकेत मनोमिलन केल्यानंतर दोन कुटुंबातील राजकीय वैमनस्य कमी झाले. मात्र, मनोमिलन तुटल्यानंतर पुन्हा हे वैमनस्य उफाळून आले होते.
आता दोघेही भाजपमध्ये असल्याने पक्षीय पातळीवर दोघांमध्ये राजकीय मनोमिलन घडून आले आहे. लोकसभा निवडणुकीत आ. शिवेंद्रसिंहराजेंनी उदयनराजेंना दमदार सोबत दिली होती. त्यापूर्वी सातारा जिल्हा सहकारी बँकेत संचालक होण्यासाठीही उदयनराजेंना शिवेंद्रसिंहराजेंनी मदत केली होती. गत काही महिन्यात उदयनराजेंनी शिवेंद्रसिंहराजेंच्या सुरुची या निवासस्थानी तिनदा भेट दिली होती. जिल्हा बँक निवडणूक, लोकसभा निवडणूक व वाढदिवस या तीन वेळी उदयनराजे सुरुची निवासस्थानी गेले होते.
आ. शिवेंद्रसिंहराजे मात्र मनोमिलन तुटल्यापासून जलमंदिर येथे गेले नव्हते. तब्बल आठ वर्षानंतर शुक्रवारी रात्री शिवेंद्रसिंहराजे जलमंदिर येथे गेले. यावेळी दोघांनी एकमेकांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानेही चर्चा केली. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जिल्ह्याची राजकीय धुरा सांभाळण्याबाबत उदयनराजेंनी वक्तव्य केले होते. सध्याही तशीच परिस्थिती निर्माण झाली असून, आगामी विधानसभा निवडणुकीतील राजकीय समीकरणांवर दोघांनी चर्चा केली.
आ. शिवेंद्रसिंहराजेंनी जलमंदिरवर जाताना पाच कॅडबरी नेल्या होत्या. त्यातील 1 कॅडबरी उदयनराजेंना दिली, तर 4 कॅडबरी काका धुमाळ यांना दिल्या. यावर ’काकावर लक्ष ठेवा’ अशी कोपरखळी उदयनराजेंनी शिवेंद्रसिंहराजेंना मारली. डेअरी मिल्कची सिल्क हर्ट ब्लूश (हृदयाची लाली) ही कॅडबरी शिवेंद्रसिंहराजेंनी उदयनराजेंना दिली.