7.3 C
New York
Friday, October 11, 2024

Buy now

spot_img
spot_img

गृहमंत्र्यांनी कुणाला वाचवण्यासाठी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर केला?

पृथ्वीराज चव्हाण:बदलापूर’मधील सूत्रधार कधीही समोर येणार नाहीत

मुंबई :

बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाला आहे. आरोपीला ट्रान्सिट रिमांडसाठी नेत असताना त्याच्या एन्काऊंटर झाल्याची माहिती आहे. पोलिसांनी स्वः संरक्षणासाठी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. पण हे एन्काऊंटर बोगस असून या प्रकरणातील इतर आरोपींना वाचवण्यासाठी पोलिसांनी हे घृणास्पद कृत्य केल्याचा आरोप राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. तसेच राज्याचे गृहमंत्र्यांनी कुणाला वाचवण्यासाठी पोलिसांना हे आदेश दिले असा सवालही त्यांनी विचारला.

अक्षय शिंदे याला ट्रान्सिट रिमांडसाठी नेत असताना ही घटना घडली. अक्षय शिंदेंने पोलिसांची बंदूक हिसकावण्याचा प्रयत्न केला आणि त्या झटापटीत पोलिसांनी त्याला गोळ्या घातल्या. या प्रकरणावर पृथ्वीराज चव्हाण यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केला. गृहमंत्र्यांनी कोणत्या संस्थाचालकाला वाचवण्यासाठी, इतर कोणत्या आरोपींना वाचवण्यासाठी त्याचा आवाज बंद केला असा सवाल त्यांनी विचारला.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या