10.1 C
New York
Thursday, October 10, 2024

Buy now

spot_img
spot_img

ग्रामपंचायतीला 15 लाखांपर्यंत विकास कामांसाठी अधिकार

सातारा/प्रतिनिधीः-
ग्रामपंचायतीचे प्रशासकीय प्रमुख, कार्यकारी प्रमुख, कोषाध्यक्ष असणार्‍या सरपंचांना पेन्शन आणि 15 लाखांपर्यंतची विकास कामे करण्याचा अधिकार या मागणीसाठी सरपंच परिषद, पुणे कडून सातत्याने पाठपुरावा केला. यावर लातूर येथे बैठकीत थेट मुख्यमंत्र्यांनी दोन्ही मागण्या योग्य असून कायदेशीर तरतुदी पाहून त्या. पुर्ण करतो,असा शब्द दिला होता. अखेर 75 हजार पेक्षा कमी उत्पन्न असलेल्या ग्रामपंचायतीला 10 लाखांपर्यंत तर 75 पेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या ग्रामपंचायतीला 15 लाखांपर्यंत विकास कामांसाठी अधिकार देण्याचा दि.20 सप्टेंबर रोजी शासन निर्णय काढून दिलेला शब्द पाळणारे मुख्यमंत्री असल्याचे सरपंच परिषदेचे अध्यक्ष जितेंद्र भोसले यांनी सांगितले.
खासदार,आमदार या लोकप्रतिनिधी पेन्शन मिळते, हरियाणा सरकारने सरपंचांना सुध्दा पेन्शन योजना लागू केली आहे. यावरून सरपंच परिषद, पुणे कडून महाराष्ट्रातील आजी माजी सरपंचांना सुध्दा पेन्शन योजना सुरू करावी.तसेच ग्रामपंचायतींना 15 लाखांपर्यंत विकास कामांसाठी अधिकार मिळावेत, अशा मुख्यमंत्र्यांकडे मागण्या केल्या होत्या. यावर मुख्यमंत्र्यांनी लातूर येथे परिषदेच्या शिष्टमंडळा सोबत बैठक घेऊन पेन्शन लागू करण्याबाबत शासन कायदेशीर तरतुदी अभ्यासून निर्णय घेईल.तर 15 लाखांची विकास कामे करण्याचे अधिकार लवकर देऊ अशी ग्वाही दिली होती.
सरपंच परिषदेच्या दोन पैकी 15 लाखांची विकास कामे करण्याचा अधिकार दि.20 सप्टेंबर रोजी ग्रामविकास विभागाचा शासन निर्णय काढून दिलेला शब्द पाळला असल्याचे सरपंच परिषदेच्या महिला राज्याध्यक्ष जिनत सय्यद यांनी सांगितले.
तर परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर वायाळ (माऊली ) यांनी आजी माजी सरपंचांना सुध्दा लवकरच पेन्शन योजना लागू होईल, असा विश्वास व्यक्त केला.यासाठी परिषदेच्या पदाधिकार्‍यांसोबत राज्य सरकारच्या प्रतिनिधींशी बैठका पार पडल्या असून सकारात्मक चर्चा झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी पेन्शन योजना लागू करण्याचा सरपंच परिषदेला दिलेला शब्द नक्कीच हा ही शासन निर्णय होईल असे सरपंच सुजित हंगारेकर, सरपंच विष्णू गायकवाड यांनी सांगितले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या