कराड उत्तर विधानसभा मतदार संघात माजी मंत्री आमदार बाळासाहेब पाटील हे शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत. केवळ त्यांच्या नावाची घोषणा बाकी आहे. मात्र, त्यांच्या विरोधात कोण अशी चर्चा सुरू असताना भाजपाकडून मनोज घोरपडे किंवा रामकृष्ण वेताळ यांना उमेदवारी मिळेल अशी शक्यता वाटत असतानाच आज भाजपाने पहिली यादी जाहिर केली. यामध्ये 99 उमेदवारांचा समावेश आहे. प्रत्यक्षात भाजपच्या वाट्याला असलेल्या तिन्हीही जागा जाहिर झाल्या आहेत. महायुतीतील चर्चेत हा मतदारसंघ अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला तरी सुटला नाही ना..! अशी चर्चा रंगली असून जर असे झाले तर चिन्ह घेवून हेच उमेदवार लढणार नाहीत ना.. की भाजपामध्ये अद्याप उमेदवारीवर एकमत झाले नसल्याने कदाचित ही उमेदवारी जाहीर केली नसावी, असे वाटते.
महायुतीच्या जागावाटपामध्ये शिवसेना एकनाथ शिंदे यांच्याकडे दोन मतदारसंघ अधिकृतपणे आहेत. यामध्ये पाटण आणि कोरेगाव या ठिकाणी विद्यमान आमदारांना उमेदवारी जाहीर होईलच. तर वाईमधून अजितदादांच्या कडे असलेले आमदार मकरंद पाटलांना उमेदवारी मिळेल. मात्र, कराड उत्तरचे उत्तर मात्र अद्यापही मिळाल्याचे दिसत नाही. भाजप ही जागा घेणार की अजितदादांची राष्ट्रवादी लढणार हे लवकरच स्पष्ट होईल.