तळबीड पोलिसांची कारवाई ,जप्त वाहन आणि रोकड सह भरारी पथक तपासकार्यात
उंब्रज/प्रतिनिधी
तळबीड ता.कराड येथील पोलिस ठाण्याच्या हद्दीत तासवडे टोलनाक्यावर शनिवार दि.२६ रोजी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास गुजरात मधील अहमदाबाद येथील बोलेरो जीप क्र.जिजे २७ ईई ८७३८ ही कर्नाटक ते गुजरात प्रवास करीत असताना यामधून तासवडे टोल नाका परिसरात तळबीड पोलिसांच्या तपासणीत पंधरा लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.
दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार गुजरात दोन येथील व्यापारी एका मशिनच्या व्यवहारासाठी कर्नाटक मध्ये गेले होते सदरचा व्यवहार नक्की होऊन इसारापोटी मिळालेली रोख रक्कम पंधरा लाख घेऊन दोघेजण गुजरात येथे परतत असताना ही रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे.
दोन लाखांपेक्षा जास्त रक्कम रोख स्वरुपात घेता येत नाही याची कल्पना संबधित व्यापाऱ्यांना का नव्हती याबाबत साशंकता व्यक्त होत असून आणि महाराष्ट्रातील निवडणुका सुरू आहेत आणि रोख रक्कम बाळगता येत नाही याची कल्पना नव्हती अशी संबधित व्यापाऱ्यांनी कबुली दिली असल्याची सूत्रांची माहिती असून आता इन्कमटॅक्स विभाग यांच्या खोलात जाऊन आणखी काय तपास करणार आणि खरच हा व्यवहार झाला आहे का ?असेल तर त्याची कागदपत्रे झेरॉक्स स्वरुपात न सादर करता ओरिजनल सादर करावी लागणार आहेत.