गुरूजी झाले बेजार कामासाठी मोजावी लागते रक्कम
कराड/प्रतिनिधीः-
कराड तालुक्यातील पंचायत समितीमधील शिक्षण खात्यात सावळा गोंधळ असून याची पोलखोल करत असताना काही विषय गुरूजींनी पुढे येवून काही अटी शर्तीवर माहिती देताना, जे वास्तव्य सांगितले ते अत्यंत भयानव आहे. प्रत्येक कामाचा दर ठरला आहे. मग ते पदोनत्तीची वेतणवाढ असो अथवा पगार काढण्याचे काम असो, याकरीता गुरूजींना हजारोच्या पटीत रक्कम मोजावी लागते. काम करणाराची वेगळी आणि अधिकार्यांची रक्कम वेगळी असा हा पायंडा कायम स्वरूपी सुरू असून यातून मोठ्या प्रमाणात माया गोळा करण्याचा नवा फं डाच संबंधितांनी शोधला आहे.
कराड हे विद्येचे माहेरघर म्हणून याची प्रचिती संपूर्ण राज्यभर आहे. या पंचायत समितीलाही मोठा वारसा आहे. याठिकाणी काम केलेले अनेक अधिकारी मोठ-मोठ्या पदावर गेले. तर काहींची राजकीय कारकीर्द येथून घडली. अशा या पंचायत समितीत कुंपणच शेत खात असल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. शिक्षण हे पवित्र काम ज्ञानदानाणे नविन पिढी घडते ती आदर्शवंत असावी, असा समज सर्वसामांन्यांचा आहे. मात्र कराड पंचायत समितीतील शिक्षण खात्याचा अजबच नमुना सुरू आहे. दिल्या घेतल्याची चर्चा चांगलीच घडत असताना, इथल्या वरीष्ठ अधिकारी गुरूजींना बोलवून माहितीचा स्त्रोत शोधण्याचा प्रयत्न करण्यातच गुंतल्याचे दिसते.
गेल्या दोन दिवसापासून दै.प्रीतिसंगमने कराड पंचायत समितीच्या शिक्षण विभागात दिल्या घेतल्याची चर्चा व शाळांचे प्रशासन दिवसभर व्यथ अशा मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध झाले आणि शिक्षण विभागात खळबळ उडाली. वरिष्ठांच्याकडून संबंधित अधिकार्यांना जाब विचारण्यात आला. शासनाच्या योजनातून गोलमाल करत माया जमा करण्याची लागलेली सवय ही कांगावा करून थांबत नाही. याची जानिव झाली. गुरूजींनीही धाडसाने काही माहिती समोर आणली. यातून जी माहिती समोर आली, त्यामध्ये तालुक्यात नव्याने रूजू झालेल्या मुख्याध्यापकांना त्यांच्या हक्काची वेतनवाढ मंजूर करावयाची असल्यास अथवा गुरूजींच्या यासंदर्भातील कामकाज असल्यास याचा दर ठरवला जातो. यातील 30% रक्कम संबंधिताला जाते तर उर्वरीत रक्कम विभागप्रमुखाकडे जाते असे, याविभागातील कर्मचारी उघडपणे बोलतात. वेतन वाढीसाठी लागणारी आवशक कागदपत्रे जमाकरून ती जिल्हापरिषदेकडे पंचायत समितीमार्फ त पाठवावी लागतात हे या विभागाचे रित्सर काम आहे. मात्र, त्यासाठी त्यांना हजारोच्या पटीत रक्कम मोजावी लागते. या प्रकाराची चर्चा सर्वच गुरूजनांच्यात सुरू असून, दरवाज्यालगत बसणारा इसम ही रक्कम घेवून प्रत्साव तयार करतो.
रकमेचा वाटा निश्चित करण्यात आला असून, ही वाटणी करण्याचे काम खालील लोक करतात. प्रत्येक गोष्टीमध्ये काहीना काही मिळवायचेच, हात ओला केल्याशिवाय कोणतेही काम करायचे नाही असा यांचा अलिखीत नियमच आहे. हा नियम या विभागात सूरू असल्याने सर्वसामान्य गुरूजींना स्वतःच्या हक्काची कामे करून घेतानाही अडचणी निर्माण होत असतात. आणि तेथील लोकही काम करताना अडचणी निर्माण करून वसूलीकडेच जास्त लक्ष देवून या कामासाठी संबंधित शिक्षकांना कसे हेलपाटे घालावे लागतात अथवा पदरमोड करावी लागते. यासर्व बाबीचा तपास होणे आवशक आहे. पंचायत समितीचा हा विभाग सातत्याने वादाच्या भोवर्यात असतो या विभागाची सविस्तर माहिती समोर आणने गरजेचे आहे. गम ती शालार्थ प्रणालीची असो अथवा प्रणालीद्वारे तयार करण्यात येणार्या पगार पत्रकाची असो ही सर्व माहिती समोर आणने गरजेचे आहे. शिक्षण महोत्सवाचा मोठा झोल आहे. हे ही लवकरच…
पदाधिकारी नसल्याने धाक राहिला नाही
गेल्या तीन-चार वर्षापासून राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणका पार पडल्या नाहीत यामुळे पंचायत समितीला पदाधिकारीच नाहीत. पदाधिकारी नसल्याने अधिकार्यांची मनमानी सुरू आहे. याचाच फ ायदा हे लोक घेत आहेत. आता लोक प्रतिनिधींनी या गोष्टीकडे लक्ष देवून यवंत विचाराची पंचायत समिती कारभाराबाबत गुनवंत बनवण्यासाठी प्रयत्न करावेत. अन्यथा हे शिरजोर झालेले, सर्वसामान्य लोकांना आणि गुरूजींना पिळून काढतील.