0.6 C
New York
Saturday, January 11, 2025

Buy now

spot_img
spot_img

‘कराड शासकीय अभियांत्रिकी’मध्ये रोजगार मेळाव्याचे आयोजन

महाविद्यालय व केंद्रीय संस्था शिक्षूता प्रशिक्षण मंडळाचा संयुक्त उपक्रम, ७ हजार रोजगाराच्या संधी उपलब्ध

कराड/प्रतिनिधी : –

राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या संकल्पनेतून स्थापित शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, कराडमध्ये सामाजिक दायित्वाची भावना जपत ११ जानेवारी रोजी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात बीइ/बीटेक/डिप्लोमा/बी फार्म/आयटीआय/बीएससी/बीए/बी.कॉम आणि इतर विविध अभ्यासक्रमांच्या टेक्निकल, नॉन टेक्निकल विद्यार्थ्यांसाठी १२५ पेक्षा जास्त विविध क्षेत्रातील नामांकित कंपन्यांमध्ये तब्बल सात हजारपेक्षा जास्त देशात व परदेशात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या डीन प्रो. उमा पाटील यांनी दिली.

येथील शासकीय विश्रामगृहात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात होणाऱ्या भव्य रोजगार मेळाव्याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रा. पौर्णिमा कावलकर, प्रा. यादव व प्रा. गायकवाड यांची उपस्थिती होती.

रोजगार मेळाव्याबाबत अधिक माहिती देताना महाविद्यालयाच्या डीन प्रो. पाटील म्हणाल्या, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, कराड व केंद्रीय संस्था शिक्षुता प्रशिक्षण मंडळ (BOAT) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्याचे आयोजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षात ७५ लाख रोजगार निर्माण करण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेच्या प्रेरणेने आणि स्किल इंडिया योजनेच्या अंतर्गत करण्यात आले आहे.

या मेळाव्यात राज्यातील सर्व पदवी, पदविका, आयआयटी, बीए, बी कॉम, बीएसी, बीबीए, बीएसी फार्मसी, टेक्निकल, तसेच नॉन-टेक्निकल विद्यार्थ्यांसाठी रोजगाराच्या संधी आहेत. मेळाव्यात १२५ पेक्षा जास्त नामांकित कंपन्यांमध्ये विविध क्षेत्रांतील नोकऱ्यांसाठी तब्बल ७ हजार पेक्षा जास्त रोजगार संधी उपलब्ध असणार आहेत. नोकरीच्या शोधात असलेल्या युवक-युवतींनी या मेळाव्यात सहभाग घेण्यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे.

हा रोजगार मेळावा शनिवार (दि. ११) रोजी सकाळी ९ वा. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, कराड येथे विनामूल्य होणार आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी नोंदणीसाठी (मो. 9860867021 व 8108322003) या नंबरवर संपर्क साधावा. तसेच ईमेल gcekjobfair@gmail.com व https://gcekarad.ac.in/general/JOB-FAIR-2025 या संकेतस्थळावर भेट द्यावी, असे आवाहनही महाविद्यालयाच्या वतीने डीन प्रो. उमा पाटील यांनी केले.

या रोजगार मेळाव्याचा उद्देश मुख्यतः राज्यातील शेती, बांधकाम, वाहतूक, पर्यटन या व्यवसायातील वाढती उलाढाल व औद्योगिक गुंतवणूक यामधून विविध क्षेत्रातील नामंकित कंपन्यांमधील सेवा क्षेत्रातील निर्माण झालेल्या रोजगार संधींचा लाभ अधिकाधिक राज्यातील ग्रामीण, शहरी, निमशहरी सर्व पात्र युवक, युवतींना मिळावा आणि त्यांना त्यांच्या करिअरची सुरुवात नामांकित कंपन्यांमधून सुरू करण्याची संधी मिळावी, हा असल्याचे डीन प्रो. उमा पाटील व प्रा. पौर्णिमा कावलकर यांनी सांगितले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या