7 C
New York
Wednesday, March 12, 2025

Buy now

spot_img
spot_img

कराडनजीक महामार्गावर बर्निंग कारचा थरार

कराड/प्रतिनिधी : –

पुणे-बंगलुरु राष्ट्रीय महामार्गावर पाचवड फाटा (ता. कराड) येथे शनिवारी सायंकाळी बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला. अचानकपणे कारला लागलेल्या आगीत कार जळून खाक झाली. दरम्यान, अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझविली. परंतु, आगीमध्ये कार संपूर्णपणे जळाल्याने मोठे नुकसान झाले.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, शनिवार (दि. 22) रोजी सायंकाळी पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर कराड शहरानजीक पाचवड फाटा येथे सातारा-कोल्हापूर लेनवर कोल्हापूरच्या दिशेने निघालेल्या कारने अचानकपणे पेट घेतला. सदर प्रकार कार चालकाच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी कारवर नियंत्रण मिळवत कार महामार्गाच्या कडेला उभी केली.

दरम्यान, याबाबतची माहिती डी. पी. जैन कंपनीच्या अपघात विभागाचे दस्तगीर आगा यांना मिळाल्यानंतर श्री आगा यांच्यासह सुनील कदम यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर त्यांनी अग्निशमन बंबाला पाचारण केले. अग्निशमनच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होत आग विझविली. परंतु, या भीषण आगीमध्ये कार संपूर्णपणे जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले आहे.

राष्ट्रीय महामार्गावर बर्निंग कारचा थरार झाल्याने महामार्गावर प्रवाशांसह बघ्यांची गर्दी झाली होती. त्यामुळे वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. अग्निशमनच्या जवानांनी आग विझविल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या